आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवे-शिरसाटांत ‘टाइमप्लीज’, हास्यकवी संमेलनानिमित्त हातचे राखूनच नेत्यांचा हास्यविनोद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रामदास फुटाणे, फ.मुं. शिंदे इतर हास्यकवींच्या राजकीय फुलबाज्यांची आतषबाजी होण्याआधी शिवसेनेत दोन दिवसांपूर्वी लावलेल्या राजकीय फटाक्यांची लड आजच्या दिवसापुरती विझलेली दिसली. हास्यकवी संमेलनाच्या निमित्ताने अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल खासदार चंद्रकांत खैरे यांनी हसतखेळत एकमेकांना भेटत ‘टाइमप्लीज’ केले. दोन दिवसांपूर्वी आमदार शिरसाट, जैस्वाल, सहसंपर्क प्रमुख अण्णासाहेब माने, नरेंद्र त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यावर टीका करत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. यामुळे शिवसेनेत राजकीय धुमश्चक्री झाली. खासदार खैरे विरुद्ध दानवे, शिरसाट विरुद्ध खैरे, शिरसाट विरुद्ध दानवे असे अनेक पदर असलेली ही राजकीय लढाई येत्या काही दिवसांत चांगलीच तापणार असल्याचे सध्याचे चित्र आहे.
प्रत्यक्षात घडामोडी सुरूच : सगळेनेते एकत्र आले तरी प्रत्यक्षात राजकीय घडामोडींना वेग आला असून दानवेंच्या विरोधात वातावरण तयार करण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. तिकडे आमदार शिरसाट यांनी आरोप केल्यानंतर सोशल मीडियावर दानवे यांच्या समर्थनाचे मेसेज सुरू झाले. त्यावरून वातावरण तापायला लागताच दानवे यांनी मध्यस्थी करीत हा प्रकार थांबवण्याचे आवाहन केले. तर शिरसाट यांनी आरोप केल्यानंतर दानवे यांनी मुद्दाम गंगापूर तालुक्याचा दौरा काढून यंत्रणा कामाला लावली. इकडे आमदार शिरसाट यांची तक्रार गांभीर्याने घेत मुंबईतील नेत्यांनी एका बैठकीचे आयोजन केले असून त्यात आपली बाजू मांडण्यासाठी जुळवाजुळव सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर रंगमंदिरात हास्य कवी संमेलन पार पडले. त्यात ख्यातनाम कवी रामदास फुटाणे, फ.मुं. शिंदे, सुरेश शिंदे, नारायण सुमंत, संजीवनी तडेगावकर, जयराम खेडकर, भरत दौंडकर यांनी उत्तमोत्तम रचना सादर केल्या

शिवसेनेतर्फे आयोजित गणेशोत्सवात रविवारी संत एकनाथ रंगमंदिरात हास्यकवी संमेलन झाले. दोनच दिवसांपूर्वी एकमेकांना पाण्यात पाहणारे आमदार संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख दानवे यांनी एकमेकांच्या शेजारी बसून हास्यकल्लोळ केला.
गणेशाेत्सवात दानवेंच्या पुढाकारानेच हास्य कवी संमेलन घेण्यात आले. या संमेलनाचे आयोजक आ. शिरसाट होते. पण पत्रिकेत उल्लेख नसल्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. आज संमेलनात काय चित्र दिसेल याची उत्सुकता होती. तेथे मात्र शिरसाट, जैस्वाल, दानवे इतर मंडळी हास्यविनोदात रमली होती. दानवे शिरसाटांना खैरेंनी शेजारीच बसवले.
बातम्या आणखी आहेत...