आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पराभूत आमदारांचे कामधंदा सांभाळून सुरू आहे राजकारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पाचते पंधरा वर्षांपर्यंत आमदार म्हणून राहिल्यानंतर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेली माजी आमदार मंडळी आता नेमकी काय करत असतील, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न ‘दिव्य मराठी’ने केला असता यातील बहुतांश जणांनी शेतीवाडी तसेच उद्योगावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. आपण आपला कामधंदा बघतोय, असे काहींनी जाहीरपणे सांगितले, तर काहींनी आपण पूर्वीसारखेच आहोत, असे सांगण्याचा प्रयत्न केला.
आता ‘माजी आमदार’ असे बिरुद लागलेली मंडळी काय करताहेत, यावर नजर टाकण्याचा प्रयत्न केला असता सर्वच जण आपापल्या परंपरागत व्यवसायात मग्न झाल्याचे दिसून आले. गत निवडणुकीत पराभूत झालेल्या पैकी माजी आमदारांशी संपर्क होऊ शकला. शिवसेनेच्या माजी आमदारांनी उद्योगधंद्यांचा उल्लेख केला नाही; मात्र डॉ. कल्याण काळे, संजय वाघचौरे यांनी आपण शेतीवाडीला वेळ बळ देतोय, असे प्रांजळपणे सांगितले. माजी मंत्री राजेंद्र दर्डा हे वारंवार संपर्क करूनही उपलब्ध होऊ शकले नाहीत. ते परंपरागत व्यवसायात व्यग्र झाल्याचे समजते.

-मी समाजकारण केल्यानेच आमदार झालो होतो. पराभूत झाल्याने फरक पडला नाही. शेती, व्यवसायासाठी तेव्हाही वेळ देत होतो अन् आताही तेवढाच देतो. आर.एम. वाणी, माजी आमदार, वैजापूर

-आता बराच वेळ आहे. शेतीकडे लक्ष देतोय. मात्र लोकांची कामे बाजूला ठेवता येत नाहीत. दुष्काळामुळे सक्रिय राहण्याशिवाय पर्याय नाही. पाच वर्षे ज्या कामांना वेळ देऊ शकलो नाही अशी स्वत:ची कामे करतोय. संजयवाघचौरे, माजी आमदार, पैठण