आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुभाष झांबड 7, तर किशनचंद तनवाणी 1.75 कोटींचे मालक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदारांना आपलेसे करण्यासाठी लाखोंची उड्डाणे घेतली गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे या निवडणुकीतील उमेदवार सुभाष झांबड आणि किशनचंद तनवाणी यांची किती मालमत्ता कमी झाली, यावर आता चर्चा सुरू आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना झांबड यांनी आपल्याकडे स्थावर आणि जंगम मिळून 6 कोटी 96 लाख (सुमारे 7 कोटी), तर तनवाणी यांनी एक कोटी 83 लाख 78 हजार रुपयांची मालमत्ता असल्याचे शपथपत्रात म्हटले होते.

झांबड यांच्या पत्नीच्या नावे चार कोटी 18 लाख, तर तनवाणी यांच्या पत्नीकडे 14 लाख रुपये किमतीची मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले. झांबड यांच्याकडे 7 लाख 15 हजार रोख होते, तर तनवाणी यांच्याकडे 2 लाख 11 हजार रोख होते. तनवाणी यांच्याकडे 28, तर त्यांच्या पत्नीकडे 86 तोळे सोन्याचे दागिने होते. झांबड यांच्याकडे 727 ग्रॅम सोने, तर त्यांच्या पत्नीकडे 500 ग्रॅम सोन्याचे दागिने असल्याचे नमूद करण्यात आले होते. तनवाणी यांच्या नावे दोन मोटारी आहेत, तर झांबड यांच्याकडे शेवरलेची एक मोटार आहे.

तनवाणी यांनी गुलमंडीवरील त्यांच्या मालमत्तेचे विवरण दिले आहे. त्यांची वेगवेगळ्या 9 बँकांमध्ये खाती असून तेथे तीन लाख 78 हजार रुपये ठेवी म्हणून ठेवण्यात आले आहेत. झांबड यांनी वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज घेतल्याचे नमूद केले असून विविध वित्तीय संस्था, अजिंठा अर्बन बँक याचे शेअरही नमूद केले आहेत.

झांबड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्ह्याची नोंद नाही. याउलट तनवाणी यांच्याविरोधात शहरातील सिटी चौक, क्रांती चौक आणि सिडको या तीन पोलिस ठाण्यांमध्ये मिळून 10 गुन्ह्यांची नोंद असून सर्व प्रकरणे न्यायदंडाधिकार्‍यांसमोर सुनावणीस आहेत. या निवडणुकीत खर्चाची र्मयादा नव्हती. त्यामुळे उमेदवारांनी झालेल्या खर्चाचा लेखा-जोखा सादर केलेला नाही. त्यामुळे कोणी किती खर्च केला, याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही.