आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Graduate, Teacher, Constituency Issue At Aurangabad, Divya Marathi

पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जून, जुलै महिन्यात पाच ठिकाणी पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका आहेत. तेथे काँग्रेसतर्फे अधिकृत उमेदवार देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. मुंबईतील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत निवडणूक आढावा बैठक झाली. त्यास राज्यभरातून आजी-माजी आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. पक्षातर्फे कुणालाही उमेदवारी घोषित करण्याऐवजी पाठिंबा देण्याची परंपरा काँग्रेसने तयार केली आहे. ती खंडित करावी, असा सूर व्यक्त करण्यात आला. तो मान्य करण्यात आला.
यासंदर्भात काँग्रेसच्या शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मनोज पाटील यांनी सांगितले की, पुणे, अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर येथे या निवडणुका होत आहेत. त्याच्या व्यूहरचनेवर चर्चा झाली. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत तेथे त्यांना पाठिंबा द्यायचा किंवा नाही, याचा निर्णय लवकरच होणार आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची स्वतंत्र बैठक होणार आहे. मात्र, ज्या मतदारसंघात विरोधकांचे आमदार आहेत तेथे काँग्रेसने पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी द्यावी. आयात केलेल्या उमेदवाराला पाठिंबा देऊ नये, असे ठामपणे ठरवण्यात आले आहे.