आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Group Ism In Congress Meating Aurangabad Divya Marathi

गटबाजांच्या नारेबाजीने काँग्रेस निरीक्षक लालबुंद, \'राडा करणे काँग्रेस संस्कृती नाही\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीसाठी पक्षनिरीक्षक या नात्याने मुजफ्फर हुसेन आणि धोंडिराम राठोड यांचे आगमन होताच आधी ‘जिंदाबाद’च्या घोषणा होतात. पण दुसर्‍याच सेकंदाला ‘अमुक एक अंगार है, बाकी सब भंगार हैं’ अशा घोषणाबाजीने अर्धा तास गांधी भवन व्यापून टाकतो. निरीक्षक लालबुंद झालेले. हाती माइक घेतल्यानंतर मोठय़ा आवाजात ओरडून ते कार्यकर्त्यांना दम इतका देतात की त्यांचाच गळा बसतो. लोकसभा निवडणुकीच्या आधी गांधी भवनाने हे चित्र सायंकाळी सहा ते साडेसात या वेळेत अनुभवले.

गटबाजांच्या घोषणाबाजीमुळे मुजफ्फर हुसेन कमालीचे चिडले होते. त्यांनी भाषणात वैयक्तिक नारेबाजी बंद करा; अन्यथा आम्हीच निघून जातो, असे सांगितले. त्याचाही काही फरक पडला नाही. घोषणाबाजी करणार्‍यांच्या नेत्याला तिकीट मिळणार नाही, असे सांगितल्यानंतर काही कार्यकर्ते शांत झाले अन् निम्मे गांधी भवनही रिक्त झाले. या वेळी प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया, शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम, इब्राहिम पटेल, नगरसेवक प्रमोद राठोड, शिवनाथ राठी, डॉ. दत्ता पाथ्रीकर, विजयकुमार जाधव, जे. के. जाधव उपस्थित होते.

सविस्‍तर बातमी वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...