आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Khaire Election Strategy Issue At Auarangabad, Divya Marathi

औरंगाबादमध्‍ये अपराजित राहण्यासाठी काँग्रेसच्या वादावर नजर ठेवण्‍याची खैरेंची खेळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- तर ‘अपराजित’ हे बिरुद कायम राहण्याची शक्यता असून सरळ लढत झाली तर काय होईल, याची धाकधूकही त्यांना लागली आहे.

गतवेळी खैरे यांचा पराभव होईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता. मात्र, शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसच्या हातून विजय निसटला. या वेळी सरळ लढत झाली, तर खैरे पराभूत होऊ शकतात, असा विश्वस काँग्रेसजनांमध्ये होता. मात्र, उमेदवारी न मिळाल्यामुळे उत्तमसिंग पवार यांनी मैदानात येण्याचे निश्चित केल्याने खैरेंच्या वर्तुळात विजयाच्या जल्लोषाची चर्चा सुरू झाली आहे. लढतीचे चित्र 8 एप्रिलनंतर स्पष्ट होईल.

1987 मध्ये पालिकेच्या निवडणुकीत खैरे गुलमंडीवरून विजयी झाले. त्यानंतर 1990 आणि 95 मध्ये औरंगाबाद पश्चिममधून ते विधानसभेवर गेले. त्यानंतर 1999, 2004 आणि 2009 असा तीन वेळा त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. 2004 मध्ये त्यांची लढत माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांच्याशी झाली होती. पाटील हे त्याआधी कधीच पराभूत झाले नव्हते. या रंगतदार लढतीत खैरेंनी रामकृष्णबाबांचे अपराजित हे बिरुद काढून स्वत:च्या नावावर केले. 2009 मध्ये त्यांनी उत्तमसिंग पवार यांचा पराभव केला आणि आयुष्यातील सातव्या लढतीत अपराजित राहण्यासाठी आता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

थेट संपर्क हेच बलस्थान : 15 वर्षांच्या खासदारकीत खैरे यांनी जिल्ह्यासाठी काहीच केले नाही, असा आरोप त्यांच्यावर होतो. विकासकामे जिल्ह्यात दिसत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तरीही थेट संपर्काच्या जोरावर मते मिळतील, अशी खैरे यांना अपेक्षा आहे. अडीनडीला मदतीला धावण्याबरोबरच रात्री-अपरात्री मोबाइलवर उपलब्ध होणे, ही खैरे यांची खासियत आहेत. विमान प्रवास वगळता त्यांचा मोबाइल कधीही बंद असत नाहीत. ते दिल्लीत असताना सर्वांसाठी उपलब्ध असतात. या एकमेव जमेच्या बाजूवर पुन्हा दिल्लीच्या विमानात बसण्याचा योग नक्कीच येईल, असा त्यांना विश्वास आहे.