आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Khaire, Lomte, Pawar Issue,

लोकसभेच्या 70 लाख रुपये खर्च मर्यादेवरून मतभेद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या दहा वर्षांत काँग्रेसने महागाई वाढवल्यामुळे निवडणूक खर्चाची र्मयादा 70 लाखांपर्यंत वाढवणे गरजेचे होते, असे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना वाटते. एवढय़ा रकमेची गरज नाही, प्रामाणिकपणे काम केल्यास 40 लाखही जास्त होतात, असे काँग्रेसकडून इच्छुक उत्तमसिंग पवार यांना वाटत. गरज तेथेच खर्च केला तर पहिलीच र्मयादा जास्त होती, असे ‘आप’चे उमेदवार सुभाष लोमटे म्हणतात.
2009 मध्ये निवडणुकीत खर्चाची कमाल र्मयादा 40 लाख होती. यंदा सर्वच पक्षांनी मागणी केल्यामुळे निवडणुकीसाठी ही र्मयादा 70 लाखांवर नेण्यात आली आहे. यापेक्षा जास्त र्मयादा हवी, असे काहींचे म्हणणे असले तरी औरंगाबाद मतदारसंघातून काँग्रेसचे संभाव्य उमेदवार, ‘आप’चे उमेदवार यांनी हा आकडा मोठा असल्याचे म्हटले आहे. स्वातंत्र्याच्या 60 वर्षांत सत्ताधारी तसेच विरोधी बाकांवरील पक्षांनीच बूथवर मतदार आणण्यासाठी पैसे देण्याची सवय लावल्यामुळे र्मयादा वाढवून घेण्याची वेळ त्यांच्यावर आल्याची टीका होत आहे.
‘आम आदमी’चे म्हणणे पैशाची गरज ती काय?
काँग्रेसने गेल्या दहा वर्षांत प्रचंड महागाई वाढवली. त्यामुळेच खर्चाची र्मयादा वाढवण्याची गरज होती. काँग्रेसवाले वेगवेगळ्या मार्गाने खर्च करतात, त्यामुळे त्यांना या र्मयादेची गरज नसावी. पण आयोगाचा निर्णय योग्यच आहे. चंद्रकांत खैरे, शिवसेना, उमेदवार
प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करणार्‍या कार्यकर्त्याला एवढा खर्च येत नाही. गतवेळी 40 लाखही खर्च झाले नव्हते. पण सर्वांनीच मागणी केल्यामुळे हा निर्णय घेतला असावा. पण एवढा खर्च कोणी करेल असे वाटत नाही. उत्तमसिंग पवार, इच्छुक उमेदवार, काँग्रेस.
खर्च जेवढा कमी तेवढे चांगले. आतापर्यंतच्या पक्षांनीच खर्च वाढवला. मतदारांना बूथपर्यंत नेण्यासाठी पैशाची सवय लावली. पण ‘आप’सारख्या पक्षाला लाखभर रुपयेही लागणार नाहीत. र्मयादा खूप वाढवली. सुभाष लोमटे, उमेदवार ‘आप’.