आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Meeting With CM Today In City, Divya Marathi

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-जालना लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 20 मार्चला सागर लॉन्स, बीड बायपास येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. रात्री साडेआठ वाजता होणार्‍या या बैठकीत औरंगाबादचा उमेदवार ठरविण्याबाबत चर्चा अपेक्षित आहे. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचीही उपस्थिती राहणार आहे. दोन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी केले आहे.