आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Shivsena bjp Issue At Aurangabad

शिवसेना स्वबळावर तयार; भाजप प्रचारात गुंतला, इच्छुकांनी वाढवले मतदारसंघांचे दौरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेना-भाजपचाजागावाटपावरून वाद सुरू असला तरी भाजपच्या इच्छुकांनी त्यांच्या हक्काच्या औरंगाबाद पूर्व, फुलंब्री आणि सिल्लोड मतदारसंघांत प्रचार सुरू ठेवला आहे. पक्ष योग्य न्याय देईल, अशी आशा वाटत असल्याने सर्वांनी मतदारसंघांतील दौरे वाढवले आहेत.

जिल्हास्तरावर जागावाटप केव्हा होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यामुळे सर्वजण त्याकडे लक्ष ठेवून आहेत. प्रमुख इच्छुक मात्र प्रचाराच्या कामाला लागले आहेत. मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, बूथनिहाय रचना तसेच मतदारांशी संपर्काचे काम केले जात आहे. औरंगाबाद पूर्वमधून इच्छुक असलेले अतुल सावे यांनी ितकीट आपणालाच मिळेल, या विश्वासाने प्रचार सुरू केला आहे. दोन वर्षांपासून मतदारसंघात काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. सिल्लोड मतदारसंघात सुरेश बनकर तसेच फुलंब्रीमध्ये हरिभाऊ बागडे यांनी त्यांचा प्रचाराचा जोर कायम ठेवला आहे. ग्रामीण भागात दौरे करून बैठका, मेळाव्याच्या माध्यमातून प्रचारावर भर असल्याचे बनकर यांनी सांगितले. जिल्ह्यात शिवसेना सहा आणि भाजप तीन जागा लढवत आहे. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे प्रत्येकाला युतीत कोणाला किती जागा सुटतात याची उत्सुकता आहे. एकदाचे जागावाटप होऊन ितकीटवाटप व्हावे, अशी अपेक्षा काही इच्छुक व्यक्त करत आहेत.

युतीतुटली, तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढायला तयार राहा, अशा सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर त्या दृष्टीने शिवसेनेची औरंगाबाद पूर्वची यंत्रणा कामाला लागली आहे.

मुंबईत झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी औरंगाबादसह मराठवाड्यातील भाजपच्या कोट्यातील जागा लढण्यासाठी तयार राहण्याचे आदेश दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद पूर्वमधून महापौर कला ओझा, शहरप्रमुख राजू वैद्य, सुहास दाशरथे यांनी तयारी दर्शवली आहे. महापौर कला ओझा यांच्यासाठी खुद्द खासदार चंद्रकांत खैरे प्रयत्नशील असल्याचेही पक्षातील सूत्रांनी सांगितले.

पूर्वमध्ये शिवसेनेचे १३ नगरसेवक असतानाही हा मतदारसंघ भाजपला दिल्याने शिवसेनेत नाराजी आहे; पण जागावाटपात हा मतदारसंघ नेहमीच भाजपला जातो. शिवसेनेच्या नेटवर्कवरच भाजपला मते मिळतात, त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार असला तर हक्काची मते मिळतील भाजपचा नक्शा उतरवता येईल, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.शिवसेनेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, आताच युती तुटली तर मनपा निवडणुकीतही स्वतंत्र लढणे सोपे जाणार आहे. निदान संधीची वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना वाव तरी मिळेल, अशी भावना आहे. मुंबईहून परतलेल्या खासदार चंद्रकांत खैरे यांनीही पूर्वच्या पदाधिकाऱ्यांसोबत अनौपचारिक संवाद साधत त्यांना सूचना दिल्याचे सूत्रांनी म्हटले.

तोडगा निघेल
फुलंब्रीतूनइच्छुक असलो तरी जिल्हाध्यक्ष म्हणून काम सुरू आहे. लवकरच तोडगा िनघेल. जागावाटपानंतर प्रचाराला वेग येईल. एकनाथजाधव, जिल्हाध्यक्ष,भाजप.

त्यांच्या निर्णयाकडे लक्ष
मुंबईतबोलणी सुरू आहे. त्यांच्या निर्णयावर सर्वांचेच लक्ष आहे. युती ठेवायची की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील. चंद्रकांतखैरे, खासदार.