आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता ‘तारीख पे तारीख’, आंदोलनात २ लाख शेतकरी उतरल्याचा केला दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जून पर्यंत मागण्या मान्य झाल्यास हाती रुमणे घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी औरंगाबादेत दिला होता. त्यानुसार मंगळवारी दुष्काळी जिल्ह्यात या पक्षाने धरणे आंदोलन केले. मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या ७८ तालुक्यांत हे आंदोलन करण्यात आले. यात २ लाखांवर शेतकरी उतरले होते, असा दावा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाला आम्ही आणखी १५ दिवसांची मुदत देत असल्याचे सांगितले. त्यावेळी अधिक आक्रमकपणे आंदोलन करू, असा दुसरा इशारा त्यांनी दिला.

येत्या दोन दिवसांत पाऊस सुरू झाला तर शेतकरी १५ दिवस कसे थांबतील, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही. संपूर्ण कर्जमाफी, खरिपाच्या पेरणीसाठी मोफत बी-बियाणे, विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क माफी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन होते. मंत्रिमंडळ बैठक बोलावणे, त्यात निर्णय घेणे, याला वेळ लागतोच. मात्र १५ दिवसांत शासनाने निर्णयच घेतला नाही तर अधिक आक्रमकपणे पक्ष आंदोलन करेल, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनाही लवकरच आंदोलन करणार असून त्याची रूपरेषा लवकरच स्पष्ट केली जाणार आहे.
आमचीमते फुटली नाहीत : ठाणेस्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव डावखरे हे पहिल्यांदाच पराभूत झाले. काँग्रेस-आघाडीची मते फुटल्यामुळे हा पराभव झाल्याची चर्चा असली तरी तटकरे यांनी मात्र आघाडीची मते फुटल्याचे नाकारले आहे. ते म्हणाले, विजयासाठी आवश्यक तेवढे संख्याबळ नसतानाही डावखरे लढले.

शेतकऱ्यांना ठेंगाच
सरकार स्थापनेला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजप सरकारने मोठ्या प्रमाणावर जाहिराती केल्या. त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मात्र ठेंगा दाखवण्यात आल्याचे तटकरे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...