आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Parties Welcomed CET Of Divya Marathi For Corporators

'दिव्य मराठी'च्या नगरसेवक पात्रता चाचणी उपक्रमाचे विविध पक्षांतर्फे स्वागत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वॉर्डाचा, पर्यायाने शहराचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेतील कामकाजाची माहिती असणारे नगरसेवक तेथे जाणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत 'दिव्य मराठी'ने इच्छुक उमेदवारांसाठी ४ एप्रिलला पात्रता चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाचे सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिका-यांनी जोरदार स्वागत केले आहे. या चाचणीमुळे इच्छुकांनाही मदत होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
चाचणी घेतल्यामुळे ज्या संस्थेत निवडून जायचे आहे, त्या मनपाबद्दलची माहिती इच्छुकाला आहे की नाही, यासंबंधी कळणार आहे. तसेच यानिमित्ताने उमेदवारही मनपाच्या कामकाजाविषयीचा अभ्यास करतील व त्यातून विकास कसा करायचा याचे धडेही मिळतील, असे मत विविध पक्षांच्या पदाधिका-यांनी व्यक्त केले. काही विद्यमान नगरसेवकांनीही या परीक्षेत उत्स्फूर्तपणे सहभागी होणार असल्याचे आश्वासन दिले. पात्रता चाचणी शनिवारी घेण्यात येणार असून ५० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. सर्व प्रश्न बहुपर्यायी व लघुत्तरी असतील. परीक्षेची वेळ आणि ठिकाण नंतर जाहीर केले जाणार आहे.

पूर्वनोंदणी आवश्यक
ही चाचणी देऊ इच्छिणा-यांसाठी नियोजनाचा भाग म्हणून नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
इच्छुकांनी आपले नाव, वाॅर्ड क्रमांक, राजकीय पक्ष िकंवा अपक्ष, प्रश्नपत्रिकेचे अपेक्षित भाषा माध्यम (मराठी/हिंदी/उर्दू) ही माहिती एसएमएस अथवा व्हाॅट्सअॅपने ९८८१३००८२१ अथवा ९४२३१८८५०० या भ्रमणध्वनी क्रमांकावर पाठवावी.

नोंदणी करणा-या उमेदवारांना नोंदणी क्रमांक दिला जाईल आणि चाचणीच्या वेळी उत्तरपत्रिकेत केवळ तो नोंदणी क्रमांक लिहावा लागेल.
पुढे वाचा.. प्रतिक्र‍िया