आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Person Dont Interference In Riots Says Police Commissioner

बेगमपुरा दंगलप्रकरणी राजकारण्यांची लुडबुड नको

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बेगमपुर्‍यात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांनी लुडबूड करू नये, अन्यथा त्यांच्याविरुद्धही कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुक्त म्हणाले, प्रकरण व्यवस्थित हाताळले जात आहे. सर्व आरोपींना अटक केली जाईल. प्रकरण पूर्वनियोजित नसले तरी त्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे काम सुरू आहे. यामध्ये कोणीही लुडबुड करण्याचे कारण नाही. दंगलीत पाच दुचाकी, दोन मेडिकलची दुकाने, दोन कार आणि तीन रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे. दंगलीत सहभागी कोणालाही सोडणार नाही. तपासानंतर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. व्हॉट्सअँपवरून अफवा पसरवणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. आमदार प्रदीप जैस्वाल व काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद अक्रम यांनी घटनास्थळी येण्याचे कारण नव्हते, असे आयुक्तांनी आवर्जून सांगितले.