आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political Pressure In Posted Commissioner Prakash Mahajan

बदली राजकीय दबावातून आयुक्त प्रकाश महाजनांचे आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद अविश्वास ठरावानंतर औरंगाबाद महापािलकेच्या आयुक्तपदावरून प्रकाश महाजन यांना हटवण्यात आले. सेवानिवृत्तीला अवघा दीड महिना शिल्लक असताना झालेल्या या निर्णयामुळे दुखावलेल्या महाजनांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून त्यात त्यांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या हेतू आणि कार्यपद्धतीबद्दल अनेक गौप्यस्फोट केले आहेत. आयुक्तांना हटवण्याबाबत सर्वाधिक आग्रही असलेल्या सभागृह नेते राजेंद्र जंजाळ आणि उपमहापौर प्रमोद राठोड यांच्यावर त्यांनी थेट आरोप केले आहेत.

आपण आयुक्तपदावर रुजू झाल्यापासूनच (३ सप्टेंबर २०१४) नगरसेवकांनी आपल्या कामात अनावश्यक हस्तक्षेप करायला, आपल्याला आपल्या कर्तव्यापासून परावृत्त करायला सुरुवात केली. त्यात शिवसेना, भाजप आणि एमआयएमचे नगरसेवक प्राधान्याने होते, असे महाजन यांनी याचिकेच्या प्रारंभीच नमूद केले आहे.

ज्या सर्वसाधारण सभेत अविश्वास प्रस्ताव आणला गेला त्या सभेच्या मूळ अजेंड्यावर तो विषयच नव्हता. वेगळ्याच २७ िवषयांचा अजेंडा १२ आॅक्टोबरला जारी करण्यात आला होता. मात्र, १४ आॅक्टोबरला आपण राजेंद्र जंजाळ यांना अपात्रतेची नोटीस दिल्यानंतर पुरवणी अजेंडा काढून त्यात अविश्वास प्रस्ताव टाकण्यात आला, असे याचिकेत म्हटले आहे.

अडथळा पार करताना...लक्ष घातले म्हणून
निविदाप्रक्रिया आणिनिवड प्रक्रिया यात गैरव्यवहार रोखण्यासाठी आपण त्यात वैयक्तिक लक्ष घातले. नगरसेवकांना ती बाब आवडली नाही आणि अविश्वास प्रस्ताव आला.
दंड लावला म्हणून
नगरसेवकनाराजझाले, कारण महापािलकेच्या थकबाकीदारांना मासिक टक्के दंड लावण्याचा निर्णय आपण घेतला. ते होऊ नये म्हणून अविश्वास आणला.

ठेका नाकारल्यामुळे
उपमहापौरांचाआग्रहहोता की, ध्वनिक्षेपक यंत्रणा बसवण्याचा ठेका आपल्या मर्जीतील व्यक्तीला द्यावा. मात्र आपण तसे करण्यास विरोध केल्याने अविश्वास प्रस्ताव आणला.

बिल्डर्सची फाइल रोखली
नगरसेवकांनीशहरातील बिल्डर्स, डेव्हलपर्स, उद्योजक आणि राजकीय नेत्यांच्या अवैध बांधकामांना परवानगी देण्यासाठी आपल्या आयुक्तपदाच्या पहिल्या दिवसापासून आपल्याकडे आग्रह धरला होता. त्यात काही नगरसेवकांची अवैध बांधकामे होती. ती फाइल आपण आपल्याकडेच राखून ठेवली आणि त्याचा नगरसेवकांना राग आला, असा दावाही महाजन यांनी या याचिकेत केला आहे.

एमआयएमची हातमिळवणी
महाजनयांनी या याचिकेत एमआयएमच्या नगरसेवकांवर वैयक्तिक आणि राजकीय लाभासाठी त्यांनी अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान केल्याचा आरोप केला आहे. एकमेकांच्या डोळ्याला डोळा भिडवणारे शिवसेना आणि एमआयएमचे नगरसेवक केवळ महापािलका आयुक्त पदावरून आपल्याला हटवण्यासाठी एकत्र आले हे एक आश्चर्यच असल्याचेही प्रकाश महाजन यांनी या याचिकेत नमूद केले आहे.

रामदास कदमही "लक्ष्य'
प्रकाशमहाजनांनी थेट पालकमंत्री कदम यांच्यावरही याचिकेत आरोप केले आहेत. रामदास कदम यांनी आपल्यावरील अविश्वास प्रस्ताव संमत व्हावा यासाठी विशेष पुढाकार घेतला त्यांनी प्रस्तावाच्या बाजूनेच मतदान करावे, असे फर्मान नगरसेवकांना जारी केले, एमआयएमच्या आमदारांना बोलावून घेतले आणि आयुक्तपदावरून आपल्याला हटवणे आवश्यक असल्याचे त्यांना सांगितले, असे त्यांनी नमूद केले.

राजेंद्र जंजाळ यांच्यावर आरोप
सभागृहनेते राजेंद्र जंजाळ यांनी महापािलकेच्या मालकीची मालमत्ता वापरली. त्यापोटी दीड लाख रुपये ते देणे लागतात. त्यामुळे कायद्यानुसार ते अपात्र ठरतात. तरीही त्यांनी भ्रष्ट पद्धतीने ना हरकत दाखला मिळवला. त्यासाठी त्यांना अपात्रतेची नोटीस बजावल्यामुळे ते नाराज झाले आणि पािलका सचिवांवर दबाव आणून अविश्वासाचा प्रस्ताव अजेंड्यात घ्यायला लावला, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

नोटीस दिली म्हणून
राजेंद्रजंजाळ यांनी महापािलकेची मालमत्ता वापरली आणि रक्कम भरली नाही. म्हणून त्यांना अपात्रतेची नोटीस बजावली. म्हणून अविश्वास आणला.

याचिकेद्वारे केलेल्या मागण्या
-अविश्वास ठरावाची अंमलबजावणी करण्यापासून रोखण्याचे निर्देश संबंधित प्रतिवादींना देण्यात यावेत.
-आयुक्तपदावरून आपल्याला दूर करणारा आणि रमेश पवार यांना पदभार सोपवणारा शासन आदेश रद्द करावा.
-महापािलकेच्या सभेत करण्यात आलेला आयुक्तांविरोधातील अविश्वास ठराव रद्दबातल करण्यात यावा.
-महापािलका कायदा कलम ३६(३) हे घटना विरोधी कलम म्हणून घोषित करावे आणि ते रद्द करण्यात यावे.