आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरी शिवसेनेचे राजकीय यश ‘जैसे थे’, २७ वर्षांपासून शिवसेना कायम सत्तेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीला २७ वर्षे पूर्ण झाली. पहिल्या दोन, तीन वर्षांचा अपवाद वगळता शिवसेना येथे कायम सत्तेत आहे. तसे असले तरी या पक्षाची राजकीय प्रगती झाली नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. १९८८ च्या निवडणुकीत शिवसेनेचे २७ नगरसेवक विजयी झाले होते. अपक्ष म्हणून निवडून आलेले मोरश्वर सावे पक्षात दाखल झाल्याने त्यांची संख्या २८ होती. यंदाच्या निवडणुकीत या पक्षाचे २९ अधिकृत उमेदवार विजयी झाले आहे. थोडक्यात गेल्या २७ वर्षांत शहराची प्रगती झाली, भरमसाट लोकसंख्याही वाढली. वाॅर्डही वाढले, पण शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या मात्र वाढली नाही. भाजपबरोबर युती असो वा नसो, हा पक्ष कायम २५ ते ३० च्या आकड्यांध्येच गुंतून राहिला आहे.

१९८८ च्या निवडणुकीचा विचार करता या वेळी शिवसेना मागे असल्याचे दिसते. कारण तेव्हा अवघे ६० वाॅर्ड होते. तेव्हा २७ नगरसेवक निवडून आले होते. आता पालिकेतील वाॅर्डांची संख्या शंभरीपार जाऊन ११३ झाली, तर सेनेचे निवडून आलेले नगरसेवक आहेत फक्त २९. म्हणजे तेव्हा सभागृहातील एकूण सदस्यांच्या जवळपास ४७ टक्के नगरसेवक शिवसेनेचे होते. आता हे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. तरीही येथील मोठा भाऊ आम्हीच, असा दावा आजही सेनेकडून करण्यात येत आहे. बुधवारी शहराच्या महापौरपदी पुन्हा सेनेचाच उमेदवार विराजमान झालेला असेल; परंतु सत्ता मिळवतानाही आपण अधोगतीवर आहोत, याचा विचार सेनेचे स्थानिक कर्ते-धर्ते कदापि करणार नाहीच हेही तेवढेच खरे आहे.

१९९८ मध्ये शिवसेनेकडून दगडही उभा केला तरी निवडून येईल, अशी परिस्थिती होती. त्याला येथील दंगलीची पार्श्वभूमी होती. त्यानंतरही हा प्रभाव कायम राहिला. मात्र, पुढे स्थानिक नेत्यांची हुकूमशाही, आपल्याच मर्जीतील व्यक्तीलाच उमेदवारी, निष्ठावानांना डावलणे असे प्रकार होत राहिले. त्यामुळे बंडखोरांची संख्या कायम ८ ते १० च्या आसपास राहिली. निवडणुकीनंतर हे बंडखोर पुन्हा पक्षात दाखल होत असल्याने शिवसेनेला सत्तेने कधीच दगा दिला नाही; परंतु अधिकृत जागांची संख्या मात्र स्थिरच राहिली. २०१० च्या निवडणुकीत सेनेचे ३० नगरसेवक निवडून आले होते. त्यांना बंडखोरी करून विजयी झालेल्या तिघांनी समर्थन दिले होते. त्यामुळे प्रत्यक्षात त्यांचे तीसच नगरसेवक असले तरी दावा मात्र ते कायम ३३ असाच करत राहिले.

१९९८ मध्ये शिवसेनेकडून कोणीही उभा केला तरी निवडून येईल, अशी परिस्थिती, आजही हा प्रभाव कायम

पुढे वाचा... पहिल्यांदाच ‘धनुष्यबाण’