आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Politics At Fulambri Loksabha And Vidhansabha Planning

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण: भाजपची लोकसभा, विधानसभेसाठी तयारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने जालना लोकसभेचे खासदार व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष यांनी फुलंब्री तालुक्यात बैठकांचे सत्र सुरू केले आहे.
2014 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. जालना जिल्ह्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी 1 जूनपासून सर्कलमध्ये बैठकांचे सत्र आयोजित केले आहे. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना निवडणुकांचे वातावरण तयार झाल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात निर्माण झाले आहे. 1 जून ते 5 जूनदरम्यान विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. वडोदबाजार येथे त्याचा समारोप झाला. पाच दिवसांच्या बैठकीत तालुक्यातील 92 गावे, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांचा अहवाल व गावागावात काय विकासकामे करायची याबाबत कार्यकर्त्यांकडून माहिती जाणून घेण्यात आली.
या वेळी 2014 च्या निवडणुका कशा असतील याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले असून दोन वर्षांत घराघरापर्यंत पोहोचण्याचा काही पक्षांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केला आहे.
औरंगाबाद जिल्हा परिषद सध्या कॉँग्रेसच्या ताब्यात असून फुलंब्री पंचायत समितीही कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला वडोदबाजार जिल्हा परिषद गट वगळता म्हणावी तेवढी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांत नैराश्य पसरले होते; परंतु या बैठका सुरू झाल्याने त्यांच्या उत्साहात वाढ झाली आहे.
फुलंब्री तालुक्यात सध्या कॉँग्रेस-भाजप तुल्यबळ असून गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या आमदार कल्याण काळे यांचा अवघ्या अडीच हजार मतांनी विजयी झाला होता, तर भाजपचे हरिभाऊ बागडे पराभूत झाले होते. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा या दोन पक्षाच चुरस रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासून काही नेत्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असू मतदारांच्या समस्या समजून घेण्यास सुरुवात केली आहे. इतर पक्ष काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.