आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय समितीच्या आडून जिल्हा परिषद ‘शिक्षकां’चे राजकारण ! शाळेला ठोकले टाळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - जिल्हापरिषद शाळेला कायमस्वरूपी मुख्याध्यापक मिळावा तसेच प्रभारी मुख्याध्यापिकेचा चार्ज काढून दुसऱ्या शिक्षकाला द्यावा, या मागणीसाठी शालेय समितीने बुधवारी शाळेला टाळे ठोकून शिक्षकांसह विद्यार्थांना दीडतास शाळेबाहेर ताटकळत उभे केले. अखेर केंद्रप्रमुखांच्या मध्यस्थीने हे प्रकरण निवळले. त्यानंतर शाळेचे टाळे उघडून शाळा पूर्ववत सुरू करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसीचे पोलिसही शाळेत दाखल झाले होते.

जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ८४७ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. त्यासाठी १८ महिला शिक्षिका पुरुष शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मुख्याध्यापक गवळी हे ३१ िडसेंबर २०१४ रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे मुख्याध्यापकपदाचा चार्ज सहशिक्षिका एस.ए. नाव्हकर यांच्याकडे सोपवण्यात आला. मात्र, पदभार स्वीकारल्याबाबत शालेय समितीला केवळ तोंडी माहिती देण्यात आली. दरम्यान विद्यार्थांची शालेय सहल काढण्यात आली होती. त्यामुळे शालेय समितीला लेखी माहिती देण्यास वेळ लागला. मात्र, इथेच समितीचा इगो दुखावला गेला आणि शिक्षिका आम्हाला प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून मान्यच नसल्याचा पाढा शालेय समितीच्या अध्यक्षांनी केंद्रप्रमुखासमोर वारंवार वाचला. अखेर ग्रामपंचायत सदस्य संजय दुबिले यांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. दरम्यान हेड काॅन्स्टेबल पंडित वाघ घटनास्थळावर आले होते.

शाळेला ठोकले टाळे
गावातीलशेकडो विद्यार्थी नियमितप्रमाणे बुधवारी सकाळी ९.३० वाजता शाळेत दाखल झाले. मात्र, शाळेच्या गेटला शालेय समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी काही गावकऱ्यांनी त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी टाळे ठोकले होते. कुलूप पाहून विद्यार्थी शिक्षक शाळेबाहेर उभे होते. दरम्यान वाळूज येथील केंद्रप्रमुख देविदास सूर्यवंशी यांना प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी जोगेश्वरी शाळेकडे धाव घेतली. संबंधित प्रकार कायद्याचे उल्लंघन करणारा असल्याची जाणीव त्यांनी संबंधितांच्या लक्षात आणून दिली. त्यावेळी त्यांनी टाळे खोलून शिक्षक विद्यार्थांना शाळेत प्रवेश दिला.

या प्रकरणात मास्तरांचीच ‘शाळा’
तत्कालीनप्रभारी मुख्याध्यापिका डबडबलेल्या डोळ्यांनी माझे पद काढून घ्या मी शिक्षिका म्हणूनच ठीक आहे. काही चुकले असेल तर मी हात जोडून माफी मागते, अशी वारंवार िवनवणी करत होत्या. दरम्यान शालेय समितीकडून मुख्याध्यापक पदाकरिता दोन शिक्षकांची नावे पुढे करण्यात आली. संबंधित नावे पुढे आलेल्या या दोन शिक्षकांच्या राजकारणातूनच तर हा प्रकार घडला नसावा? अशी चर्चा पालकांमध्ये होती.

शाळेत राजकारण नको
-संबंधितमहिला मुख्याध्यापिकेकडे पदभार आहे. त्यांच्याबाबत विद्यार्थी पालकांकडून कुठलीही तक्रार नाही. तरीसुद्घा शाळेला टाळे ठोकण्याचा प्रकार घडला, याची मी चौकशी करणार आहे. आम्ही शाळेला आयएसओ मानांकन कसे मिळवून देता येईल, यासाठी प्रयत्न करत असताना हा प्रकार निंदणीय आहे. योगेशदळवी, सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत जोगेश्वरी

वरिष्ठांकडे अहवाल
-मुख्याध्यापक कोण असावा? याबाबत मी निर्णय घेऊ शकत नाही. आजचा प्रकार कायद्याचे उल्लंघन करणारा होता. शांततेच्या मार्गाने प्रश्नाची उकल झाली. अन्यथा संबंधितांवर कायदेशीररीत्या गुन्हा दाखल करण्यात आला असता. घडलेल्या प्रकाराची माहिती मी वरिष्ठांना दिली आहे, पुढील निर्णय तेच घेतील. देविदास सूर्यवंशी, केंद्रप्रमुख, वाळूज