आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपर मिलचे दूषित पाणी गोदावरी पात्रात; अहवाल वरिष्ठांकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - जायकवाडी बॅकवॉटरपासून तीन हजार फुटांच्या अंतरावर असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये कायगाव पेपर मिलमधील दुर्गंधीयुक्त दूषित पाणी सर्रासपणे सोडण्यात येत आहे. याबाबत ग्रामस्थांच्या आलेल्या तक्रारीवरून महसूल प्रशासनाने पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे.

कायगाव पेपर मिलकडून अनेक वर्षांपासून गाेदावरी पात्रामध्ये दूषित पाणी सोडले जात आहे. स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात अनेक वेळा महसूल प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पुराव्यासह तक्रारी केल्या, परंतु प्रत्येक वेळी संबंधित अधिकाऱ्यांना मॅनेज केल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी राजरोसपणे सोडले जात आहे. त्यामुळे २३ सप्टेंबर रोजी ग्रामस्थांसमक्ष तलाठी सतीश क्षीरसागर, ग्रामसेवक सतीश गाडेकर यांनी पाहणी करून पंचनामा केला. पंचनामा करताना जायकवाडी जलाशयापासून ते पेपर मिलपर्यंत नागरिकांनी आलेले दूषित पाणी महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना दाखवले.

जनावरांचा जातोय हकनाक बळी
दूषित पाण्यामुळे काही झाडे वाळली आहेत. हे दूषित पाणी प्यायल्यामुळे सुभाष जगधने या शेतकऱ्याची गाय दगावली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गंगापूर शहरासह अनेक गावांसाठी याच पात्रातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालादेखील धोका निर्माण झाला असून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी तात्यासाहेब रोडगे, कायगावचे उपसरपंच शेख हारुण रशीद, सोमनाथ गायकवाड, पंकज बिरुटे, समाधान गायकवाड, शांतीलाल कुंभारे, उषा नजन, रघुनाथ मोहीम, अनिल बिरुटे आदींनी केली आहे.