आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे घाणेरडे पाणी पिऊन दाखवा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘नुसते हो हो काय करता? हे पाणी पिऊन दाखवा!' असे सुनावत रमानगरच्या नागरिकांनी नळाला आलेल्या काळ्याशार पाण्याने भरलेली बाटली औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटी कंपनीचे व्यवसायप्रमुख गौरीशंकर बसू यांच्या नाकासमोर धरली. त्या दुर्गंधीने चेहरा वेडावाकडा करीत बसू यांना सोबत घेत नागरिकांनी त्यांना रमानगरची पायीच सैर घडवली. संतापलेल्या नागरिकांनी या वेळी चांगलीच ढकलाढकल केली. येत्या आठ दिवसांत हे काम पूर्ण करण्याचा शब्द दिल्यावरच बसू यांची तेथून सुटका झाली.
१ सप्टेंबरपासून शहराची पाणी योजना ताब्यात घेणाऱ्या औरंगाबाद सिटी वाॅटर युटिलिटी कंपनीला पाण्याचे चटके आताच जाणवायला लागले आहेत. कंपनीच्या कारभाराबाबत दिवसेंदिवस नाराजी वाढत असून आज रमानगरात त्याचा जाहीर स्फोटच झाला. नळावाटे चक्क ड्रेनेजचे पाणी येत असल्याने नागरिकांनी आज रुद्रावतार धारण करीत जोरदार आंदोलन केले. दीड तास चाललेल्या या आंदोलनाने समांतरच्या अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली होती.

वर्षभरापासून समस्या
रमानगरात मागील एक वर्षापासून ड्रेनेजलाइन फुटून रस्त्याने दुर्गंधीयुक्त पाणी वाहत होते. त्याचबरोबरच पिण्याचे पाणी दूषित येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी यापूर्वी महानगरपालिकेला दिल्या. मात्र, तक्रार करूनही महानगरपालिकेचा एकही कर्मचारी इकडे फिरकला नाही.