आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅडिकोसह आठ उद्योगांना प्रदूषण मंडळाची नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- प्रदूषणावरनियंत्रण राखण्यासाठी नियमांचे पालन केले नसल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने आैरंगाबाद हायकोर्टात सादर केला आहे. शेेंद्रा पंचतारांकित आैद्योगिक वसाहतीमधील रॅडिको एन. व्ही. डिस्टिलरीसह आठ उद्योगांनी प्रदूषण नियंत्रित ठेवण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. हायकोर्टात दाखल जनहित याचिकेत प्रदूषण नियंत्रण मंडळास सुखना नदीच्या प्रदूषणासंबंधी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. चिकलठाणा आैद्योगिक वसाहतीमधील उद्योगांसह इतर मार्गाने होणारे प्रदूषण त्यावर कुठल्या उपाययोजना केल्या यासंबंधी माहिती देण्यास सांगितले होते. प्रदूषण मंडळातर्फे १३ जुलै २०१५ रोजी हायकोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार शपथपत्राद्वारे अहवाल सादर केला.

काय आहे अहवाल
हायकोर्टाच्यानिर्देशाप्रमाणे दाखल केलेल्या अहवालात सुखना नदीत घरगुती वापराचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्याचे निदर्शनात आले. नदीपात्रातील वीटभट्ट्या पूर्णपणे बंद झाल्या. नारेगाव रहेमत मशिदीजवळ कचरा मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे आढळून आले. अशोकनगर परिसरात ड्रेनेजचे पाणी नदीपात्रात सोडण्यात आले असून, शहानगर परिसरात सांडपाणी मोठ्या प्रमाणात सोडल्याचे आढळून आले. काही ठिकाणी नदीपात्रात घरे बांधून अतिक्रमण केल्याचे प्रदूषण मंडळाच्या पाहणीत आढळले.

उत्पादन थांबवण्याची नोटीस
रॅडिकोलानवीन उत्पादन थांबवण्याची नोटीस बजावण्यात आल्याचे अहवालात प्रदूषण मंडळाने स्पष्ट केले आहे. उपरोक्त याचिकेवर न्या. रवींद्र बोर्डे न्या. पी. आर. बोरा यांच्यासमोर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. नरसिंग जाधव काम पाहत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने अॅड. पी. पी. मोरे विशेष वकील म्हणून राजेंद्र रघुवंशी, मनपातर्फे अॅड. चंद्रकांत ठोंबरे, शासनाच्या वतीने सरकारी वकील ज्ञानेश्वर काळे आत्माराम ठुबे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे काम पाहत आहेत.

महापालिकेस नोटीस
उपरोक्तप्रकरणी महानगरपालिकेला नोटीस देण्यात आली आहे. प्रदूषण निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असेही सांगण्यात आल्याचे अहवालात नमूद केले. वारंवार पत्र देऊन प्रदूषणास आवर घालण्याचे मनपाला सांगितले असून, सलीम अली सरोवराजवळ मलनिस्सारण प्रकल्पाची योग्यरीत्या देखभाल दुरुस्ती होत नसल्याचे अहवालात नमूद केले आहे.

मद्यार्क निर्मिती उद्योगांना नोटीस
चिकलठाणाआैद्योगिक वसाहतीमधील मद्यार्क निर्मिती करणाऱ्या उद्योगांना नोटीस बाजवण्यात आल्याचे मंडळाच्या वतीने अहवालात स्पष्ट केले. प्रदूषणासंबंधी घालून दिलेले नियम अटी-शर्तींचे पालन झाले नसल्याचे नोटिसीमध्ये म्हटले आहे.

या उद्योगांना नोटीस
१]मे अलिड ब्लेंडर्स डिस्टिलरी, प्लॉट नंबर ६, चिकलठाणा आैद्योगिक वसाहत.
२] हार्मन फिनोकोम लि., प्लॉट नं. ई-९, चिकलठाणा
३] मे. रेडियंट इंडस केमिकल प्रा. लि., प्लॉट. नं. एफ १५, चिकलठाणा
४] मे. बेडसे पेपर मिल प्रा. लि., प्लॉट नं. एफ ३२, चिकलठाणा
५] मे. युनायटेड स्पिरीट लि., डी- ३१, ३६, ४६, ९२, चिकलठाणा
६] एनआरबी बेअरिंग्ज लि., ई-४० चिकलठाणा
७] मे. फॉर्च्यून फार्मा प्रा. लि., बी-६, शेंद्रा एमआयडीसी
८] रॅडिको एन. व्ही. डिस्टिलरी, प्लॉट नं. ९२, ९३, ९४, ९५, शेंद्रा