आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ कंपन्यांकडून प्रदूषण नियमभंग, मद्यार्क निर्मिती कंपन्यांना नोटिसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी आखून दिलेले नियम आठ कंपन्यांनी मोडीत काढल्याचा ठपका प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केलेल्या अहवालात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील रॅडिकोसह आठ कंपन्यांना नोटिसा बजावल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सुखना नदीच्या पात्रात काही कंपन्यांनी दूषित पाणी सोडल्याने परिसरातील शेतीवर भयंकर परिणाम होत असल्याच्या या परिसरातील शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. १५ वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चाही काढला होता. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाले होते. त्यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. त्यावर झालेल्या सुनावणीत शेंद्रात तसेच चिकलठाणा आैद्योगिक वसाहतीमधील उद्योगांसह इतर मार्गाने होणारे प्रदूषण कसे होते. त्यावर कुठल्या उपाययोजना केल्या यासंबंधी माहिती देण्यास सांगितले होते. मंडळातर्फे १३ जुलै रोजी शपथपत्राद्वारे अहवाल सादर करण्यात आला. मद्यार्क निर्मिती करणाऱ्या रॅडिकोसह अलिड ब्लेंडर्स डिस्टिलरी, हार्मन फिनोकेम, रेडियंट इंडस केमिकल, बेडसे पेपर मिल, युनायटेड स्पिरीट, एनआरबी बेअरिंग्ज, फॉर्च्यून फार्मा यांना नवीन उत्पादन थांबवण्याची नोटीस बजावल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...