आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ लेणी, बीबी का मकबऱ्याला प्रदूषणाचा विळखा वाढला, ऐतिहासीक वास्तूंना धुळीचा फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जागतिकवारसा स्थळ असलेली वेरूळ लेणी आणि बीबी का मकबरा प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. येथील प्रदूषणात गेल्या वर्षांत पट वाढ झाली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात काळा मकबरा आणि पडझड झालेल्या शिल्पांच्या लेणी बघण्याची वेळ पर्यटकांवर येईल. हे टाळण्यासाठी या वास्तूंभोवताली बफर झोन तयार करण्याची सूचना पुण्याच्या एका संस्थेने केली आहे. 

सेंटर फॉर रिसर्च, कन्झर्व्हेशन अँड रिस्टोरेशन अॉफ मॉन्युमेंट्स ही संस्था जगभरातील पुरातन वास्तंूचा अभ्यास करून त्याच्या संवर्धनासाठी उपाय सुचवते. मकबरा आणि वेरूळला मोठा धोका असल्याचे या संस्थेच्या अार्किओलॉजिस्ट मैत्रेयी जोशी यांनी सांगितले. 

प्रदूषणाचा विळखा...
पर्यटकांच्यावाहनांच्या धुरामुळे कार्बन मोनोक्साइड आणि सल्फर डायऑक्साइडमुळे आम्ल वर्षावाची परिस्थिती निर्माण होते. तर वीटभट्ट्यांतून निघणारे कार्बन डायऑक्साइडही घातक ठरतेय. आम्ल वर्षावामुळे संगमरवरातील कॅल्शियम कार्बाेनेट वितळत असल्याने मकबरा काळवंडत चाललाय. वेरूळच्या ते ११ क्रमांकाच्या लेणींना याचा अधिक धोका आहे. मकबऱ्याला पर्यटकांच्या वाहनांसह आजूबाजूच्या वस्तीतील गोंगाट, कर्णकर्कश गाणी यामुळे कंपने निर्माण होत आहेत. तर पर्यटकांच्या एकत्रित गप्पांमुळे लेणीत गोंगाट होतो. मकबरा नागरी वस्तीत असल्याने भिंतीवर धूळ साचते. पावसाळ्यात पाणी पडताच त्यात कीटक जन्माला येतात. हे कीटक भिंत खोलवर उकरतात. 

बफरझोनचा पर्याय...
मकबराआणि वेरूळभोवतालीचा किमी परिसर बफर झोन म्हणून जाहीर करावा. या ठिकाणी बांधकाम, व्यवसाय, वाहतुकीला बंदी असावी. बफर झोनमधून वास्तूंपर्यंत जाण्यासाठी इलेक्ट्रिक टॅक्सी असावी. बफर झोनबाहेरही वीटभट्ट्या, हॉटेलातील तंदूर भट्ट्या, धूर सोडणारी वाहने, कर्णकर्कर्श आवाजातील भोंगे यावर बंदी असावी. 

बफर झोन जाहीर करा 
मकबऱ्या भोवतालीवीट भट्ट्या आहेत, तर वेरुळात अजूनही वाहने लेणीच्या पायथ्याशी जातात. हे टाळण्यासाठी या परिसराभोवताली किमान किलोमीटरचा बफर झोन तयार करण्याची गरज आहे. 
- मैत्रेयी जोशी, कन्झर्व्हेशन अार्किओलॉजिस्ट, सीआरसीआरएम, पुणे 
बातम्या आणखी आहेत...