आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pollution Free Diwali Resolution, Municipal Corporation's Students Rise Fund

'प्रदूषणमुक्त दिवाळी'चा संकल्प, मनपा शाळेतील विद्यार्थी दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी उभारणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेताना मनपा शाळेतील विद्यार्थी. छाया : अरुण तळेकर
औरंगाबाद - मराठवाड्यातगत तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे बळीराजा हताश झाला आहे. सणवार साजरे करणे तर सोडाच त्यांना एक वेळ जेवणाची भ्रांत आहे. दुष्काळामुळे त्यांच्या जीवनात जणू काळोख पसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील हा अंधकार दूर करण्याचा संकल्प इंदिरानगर येथील महानगरपालिकेच्या केंद्रीय माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला आहे. 'दिव्य मराठी'ने सुरू केलेल्या प्रदूषणमुक्त दिवाळी अभियानाला प्रतिसाद देत ५०० विद्यार्थ्यांनी या दिवाळीला फटाके फोडता त्यातून वाचणारे पैसे शेतकऱ्यांसाठी निधी म्हणून जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बळीराजाची दिवाळी आनंदात तर साजरी होईलच, शिवाय प्रदूषणमुक्त दिवाळीही साजरी होईल.

महानगरपालिकेच्या केंद्रीय माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा तसेच दुष्काळ निधी उभारण्याचा गुरुवारी संकल्प करून तशी शपथच घेतली. "दिव्य मराठी'च्या वतीने प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करा असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनास शहरातील सर्वच स्तरातील व्यापाऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता यात शालेय विद्यार्थीही सामील झाले आहेत. आज एकूण पाचशे विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करत सुट्यांमध्ये जमा होणारे पैसे एकत्र करून शाळा सुरू होताच दुष्काळग्रस्तांना देण्याचा संकल्प जाहीर केला. दरम्यान शाळेतील सांस्कृतिक मंत्री साईनाथ शिलार याने सर्व विद्यार्थ्यांना शपथ दिली. मुख्याध्यापक संजीव सोनार यांची या वेळी उपस्थिती होती. शशिकांत उबाळे, रश्मी हानमुरे, स्वाती कुलकर्णी, तेजस्विनी देसले, सुरेखा महाजन आदींनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
दिवाळी सणातील लक्ष्मीपूजन म्हणजे व्यापाऱ्यांसाठी आनंद अाणि उत्साहाचा दिवस. मात्र, तो साजरा करताना मराठवाड्यातील दुष्काळाचीही जाणीव ठेवत एक जबाबदार, जागरूक नागरिक म्हणून त्यांनी भयंकर ध्वनिप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांच्या लडी उडवणे टाळावे, असे आवाहन ‘दिव्य मराठी’तर्फे करण्यात आले आहे.

अभियानात सहभागी व्हा
जबाबदारनागरिक म्हणून प्रत्येक जण फटाक्यांचे प्रदूषण निश्चित रोखू शकतो, अशी ‘दिव्य मराठी’ची ठाम भूमिका आहे. लक्ष्मीपूजनाला व्यापारी उत्साहात फटाके आणि मोठ्या लडी फोडतात. शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये पाच, दहा, पंधरा हजारांच्या फटाक्यांच्या लडी लावल्याने तेथे रात्री उशिरापर्यंत प्रचंड आवाजासोबत धुराचे लोट असतात. रस्त्यांवर फुटलेल्या फटाक्यांचा खच असतो. व्यापाऱ्यांना आतषबाजीतून मिळणारा आनंद हिरावून घ्यावा किंवा त्यावर विरजण टाकण्याचा मुळीच उद्देश नाही. त्यांनी जरूर तो लुटावाच. पण भयंकर ध्वनी, वायुप्रदूषण निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या लडी फोडणे टाळावे. त्याऐवजी रोषणाई करणारे फटाके वापरावेत, असे ‘दिव्य मराठी’तर्फे आवाहन केले जात आहे.

दुष्काळग्रस्तांना द्या मदतीचा हात
मराठवाड्यातयंदा भयंकर दुष्काळ आहे. शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या कुटुंबांपुढे जगण्याची विवंचना आहे. अशी स्थिती असताना आपण आवाजी फटाक्यांवर लाखो रुपये उडवणे कितपत योग्य आहे? त्यापेक्षा फटाक्यांवरील काही खर्च हलाखीचे जीवन जगणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना देऊ शकतो याचाही विचार करावा, असेही ‘दिव्य मराठी’चे आवाहन आहे.