आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिटेक्निक प्रवेश आजपासून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तंत्रशिक्षण अर्थात पॉलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून (१६ जून)सुरू होत आहे. राज्यात तंत्रनिकेतनची ४९२ महाविद्यालये आहेत. त्यात १ लाख ७९ हजार ९४५ जागा उपलब्ध आहेत. मराठवाड्यातील महाविद्यालयांची संख्या ७६ असून प्रवेश क्षमता २६ हजार ६४६ इतकी आहे. एकूण जागांच्या पाच टकके "ट्यूशन फी व्हेवर स्कीम'अंतर्गत वाढतील. सहा लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेला उमेदवार यासाठी पात्र ठरेल. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणीसाठी www.dtemaharashtra.gov.in/poly2015 या संकेतस्थळावर भेट द्यावी. अर्ज स्वीकृती केंद्रावर अॅप्लिकेशन कीट घेण्यासाठी खुल्या गटासाठी ४०० रुपये तर राखीव गटासाठी ३०० रुपये शुल्क आहे. १४ ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया
चालणार आहे.
अशी होईल प्रवेश प्रक्रिया
>१६ ते २९ जूनपर्यंत अर्ज विक्री, स्वीकृती, कागदपत्रांची पडताळणी करता येईल.
>तात्पुरती गुणवत्ता यादी १ जुलैला जाहीर होईल.
>दुरुस्ती आणि प्रवेश निश्चिती २ ते ७ जुलैपर्यंत करता येईल.
>अंतिम गुणवत्ता यादी ६ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
>पहिल्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरून निश्चिती ७ ते १० जुलैपर्यंत अवधी देण्यात आला आहे.
>पहिल्या फेरीतील जागा वाटपाची तात्पुरती यादी १३ जुलै रोजी प्रसिद्ध होईल.
>विद्यार्थी जागा वाटपानुसार संस्थामध्ये नोंदणी १४ ते १७ जुलैदरम्यान करता येईल.
>दुसऱ्या फेरीसाठी संस्थातील जागांच्या उपलब्धतेनुसार यादी २४ जुलैला जाहीर होईल.
>दुसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरून निश्चिती करण्याची तारीख २१ ते २४ जुलै आहे.
>दुसऱ्या फेरीतील वाटपाची तात्पुरती यादी २७ जुलैला प्रसिद्ध होईल.
>२८ ते ३१ जुलैदरम्यान विद्यार्थी जागावाटपानुसार संस्थामध्ये नोंदणी करता येईल.
>४ ऑगस्टला समुपदेशन फेरीसाठी संस्थातील जागांच्या उपलब्धतेनुसार यादी.
>समुपदेशन फेरी १० ऑगस्टला होईल.
>विद्यार्थी जागा वाटपानुसार संस्थामध्ये नोंदणी १० ते १४ जुलैदरम्यान करता येईल.
>असे आहेत एआरसी सेंटर - शासकीय तंत्रनिकेतन, सीएसएमएस पॉलिटेक्निक