आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेस सोमवारपासून सुरुवात, 30 जूनपर्यंतचा अवधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पॉलिटेक्निक (इंजिनिअरिंग पदविका अभ्यासक्रम) प्रवेश प्रक्रियेस सोमवार १९ जून पासून सुरुवात होत आहे. यासंदर्भात सर्व माहिती संकेतस्थळावर शनिवारी जाहिर करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या निकालानंतर इंजिनिअरिंगच्या विविध अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेस वेग आला आहे. यापूर्वी ५ जून पासूनच इंजिनिअरिंग प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. 

आज उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने राज्यभरातील पॉलिटेक्निक अर्थात इंजिनिअरिंग पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठीच्या प्रवेशासाठी वेळापत्रक जाहिर करण्यात आले.
 फॉर्म विक्री आणि ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी १९ ते ३० जूनपर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. सुविधा केंद्रात जावून विद्यार्थ्यांनी नोंदणी करायची आहे. सर्व पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुविधा केंद्र नेमण्यात आलेले आहे. १९ ते ३० जूनपर्यंत नोंदणी केल्यावर तात्पूर्ती गुणवत्ता यादी १ जुलैला जाहिर करण्यात येईल. यानंतर या यादीसंदर्भात काही आक्षेप नोंदवायचे असेल, तर त्यासाठी २ ते ४ जुलै दरम्यान ते नोंदविता येतील. ५ जुलै रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहिर करण्यात येईल. ६ जुलैला उपलब्ध असलेल्या आणि रिक्त असलेल्या जागांचा तक्ता ऑनलाइन जाहिर करण्यात येईल. ज्यात शाखानिहाय व प्रवर्गनिहाय माहिती देण्यात येणार आहे.
 

>पहिल्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म ७ ते ११ जुलै दरम्यान भरायचे आहेत. पहिल्या फेरीसाठीचे जागा वाटप १३ जुलै रोजी करण्यात येईल. यानंतर एआरसी केंद्रावर जावून १४ ते १७ जुलै दरम्यान विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत. दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा १९ जुलै रोजी जाहिर करण्यात येतील. 
>दुसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत ही २० ते २३ जुलै असेल. दुसऱ्या फेरीतील जागांचे वाटप २४ जुलै रोजी करण्यात येईल. तर प्रवेश निश्चित २५ ते २७ जुलै दरम्यान एआरसी सेंटरवर जावून करायची आहे. तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तक्ता २९ जुलै रोजी जाहिर करण्यात येईल. 
>तिसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याचा अवधी ३० जुलै ते १ ऑगस्टपर्यंत असेल. या तिसऱ्या फेरीसाठीचे जागा वाटप ३ ऑगस्ट रोजी करण्यात येईल. प्रवेश निश्चित ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान करता येईल. यानंतर विद्यार्थ्यांना ज्या संस्थेत प्रवेश मिळाला आहे. त्या संस्थेत प्रत्यक्ष जावून ५ ते ९ ऑगस्ट दरम्यान प्रवेश घ्यायचा आहे.
 
स्पेशल राऊण्ड...
या प्रवेश प्रक्रियेदरम्यान शासकीय संस्थांसाठी स्पेशल राऊण्ड  होणार आहे. त्यासाठीच्या जागांचे वाटप ११ ऑगस्ट रोजी करण्यात येईल. यासाठी १२ ते १३ ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरता येतील. १४ ऑगस्ट रोजी या प्रवेशाकरिता जागांचे वाटप करण्यात येईल. १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान संस्थेत जाउन विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती करायची आहे.

>खुल्या वर्गासाठी अॅडमिशन किट ४०० रुपये तर राखीव विद्यार्थ्यांसाठी ३०० रुपये आहे.
 
आपला आयडी, पासवर्ड कुणाला देवू नका...
प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अॅडमिशन किट मध्येच त्यांचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड देण्यात येतो. बऱ्याचवेळा विद्यार्थी कॅफे अथवा मदत मिळेल अशा ठिकाणाहून ऑनलाइन अर्ज भरतात. अशा वेळी विद्यार्थ्यांची फसवणू होवू शकते. चुकीचे कॉलेज ऑप्शन भरल्या जावू शकते, पैसे वसूल केल्याचेही प्रकार समोर येतात. तेंव्हा आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड कुणालाही देवू नका. असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केले आहे.