आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिथीनला नकार हाच प्रतिष्ठेचा आधार, कॅरीबॅगचा कचरा ५० टक्क्यांनी झाला कमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात महानगर पालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग वापरण्यावर बंदी आणली आहे. त्यामुळे मागील पंधरा दिवसांत कचऱ्यात जाणाऱ्या कॅरीबॅगचे प्रमाण ५० टक्के कमी झाल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. जानेवारीपासून मनपा हद्दीतील सर्वच भागात कॅरीबॅग वापरण्यावर बंदी आणण्यात आली आहे. त्यानुसार मनपाच्या वतीने नेमण्यात आलेल्या विविध पथकांनी सर्वच भागात जाऊन व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कॅरीबॅग जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. शिवाय कॅरीबॅगपासून होणाऱ्या नुकसानीविषयी मोठ्या प्रमाणात मनपाने प्रचार-प्रसार केल्याने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. "दिव्य मराठी'च्या वतीनेही कॅरीबॅगऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्यासाठी अभियान राबविण्यात आले. मोफत कापडी पिशव्या वाटप करणाऱ्यांना ठळक प्रसिद्धी दिली. त्याचा चांगला परिणाम शहरात झाला.

अनेक नागरिकांकडून कॅरीबॅगचा वापर टाळण्यात येत आहे. त्यामुळे कचऱ्यातूनही कॅरीबॅगचे प्रमाण ५० टक्के कमी झाल्याचे समोर आले आहे.

आणखी प्रयत्न आवश्यक : शहरातीलनिम्म्या नागरिकांनी ८० टक्के व्यापाऱ्यांनी कॅरीबॅगचा वापर करणे टाळले असले तरी उर्वरित नागरिक लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी कॅरीबॅगचा वापर टाळल्यास शहरातून कॅरीबॅग हद्दपार होईल. त्याचबरोबर बेकरीमध्ये वापरण्यात येणाऱ्या कॅरीबॅग अथवा प्लास्टिक पिशव्या, पत्रावळी, पाणी पाऊच, युज अॅण्ड थ्रो पाण्याचे ग्लास, दुकानात वापरण्यात येणाऱ्या पिशव्या अथवा पॅकिंगचे प्लास्टिक यावरही काही प्रमाणात निर्बंध आणल्यास कॅरीबॅग तत्सम पिशव्यांपासून शहराची मुक्ती होईल.

या भागातून झाला कचरा कमी
शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये कॅरीबॅगचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत होता. मात्र कॅरीबॅग वापरण्यावर बंधने आल्याने या भागात होणाऱ्या कचऱ्यातही मोठ्या प्रमाणात फरक पडला. सिटी चौक, जाधवमंडी, औरंगपुरा, शहांगज, पैठण गेट परिसर, रविवार बाजार, जुना मोंढा, टीव्ही सेंटर, गजानन महाराज मंदिर, हडको-सिडको मधील वॉर्ड आणि एन-२,३,४, या भागात कॅरीबॅगचा वापर अतिशय कमी झाला आहे. भाजी विक्रेतेही आता कॅरीबॅगमध्ये भाजी देत नाहीत. त्यामुळे नागरिक कापडी पिशव्या घेऊन बाजार करत आहेत.

कॅरीबॅगचा कचरा कमी
^शहरातपूर्वी सर्वाधिक कचरा हा कॅरीबॅगचा असायचा. तो आता ५० टक्के कमी झाला आहे. आता कागदांचा कचरा वाढला असून त्याला सहज नष्ट करता अथवा विघटन करता येते. यापुढे नागरिक, व्यापाऱ्यांचे सहकार्य लाभल्यास १०० टक्के कॅरीबॅगचा वापर बंद होऊन शहर कचरामुक्त होईल. - शिवाजी झनझन, घनकचरा व्यवस्थापनप्रमुख