आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील गरीब मुलांनी लुटला मॅकडोनाल्डमध्ये जेवणाचा आनंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गरीब मुलास मॅकडोनाल्डमधून हाकलल्याची घटना पुणे येथे नुकतीच घडली. अशा घटना घडू नयेत म्हणून नगरसेवक अभिजित देशमुख यांनी रविवारी औरंगाबाद शहरातील गरीब मुलांना मॅकडोनाल्डमध्ये नेऊन त्यांना जेवण दिले.

गरीब व भीक मागणाऱ्या तीसपेक्षा जास्त मुलांना राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित देशमुख यांनी रविवारी दुपारी एक वाजता शहरातील मॅकडोनाल्डची सहल घडवली. मुलांनी विविध खाद्यपदार्थांवर ताव मारला. निरागस मुलांच्या चेहऱ्यांवर मॅकडोनाल्डमध्ये जेवण घेताना आनंद ओसंडून वाहत होता. रेस्टॉरंटमध्ये पन्नास रुपयांपासून ते दोनशे रुपयांपेक्षा जास्त किमतीचे फास्ट फूड, ज्यूस, आइस टी, कोक आदी पदार्थ व पेयजल आहेत. सर्वांसोबत छायाचित्र काढून पुन्हा मुलांना गाडीमध्ये बसवून त्यांना त्यांच्या जागी सोडण्यात आले. केवळ कपडे चांगले घातले नाहीत, म्हणून प्रवेश नाकारला, तर मॅकडोनाल्ड चालू देणार नाही, असा इशारा देशमुख यांनी याप्रसंगी दिला. पैसे देण्याची ऐपत असताना केवळ कपड्यांवरून प्रवेश नाकारला जाऊ नये, अशी मागणी देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. याप्रसंगी प्रकाश मते, वाजेद जहागीरदार, सुमीत बनसोडे, सागर शेलार, अतुल भोसले, गणेश कदम आदींची उपस्थिती होती.
प्रवेश सर्वांना
-रेस्टॉरंटमध्ये प्रवेशासाठी बंधने घालण्यात आलेली नाहीत. सर्वांसाठी खुले आहे. आम्ही व्यवसाय करायला बसलो असून ग्राहक म्हणून येणाऱ्या सर्वांचेच स्वागत आहे.
अमितेश पांडे, व्यवस्थापक, औरंगाबाद मॅकडोनाल्ड