आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Public On Road Due To Bunkers In Aurangabad City

औरंगाबाद गेले खड्यात : खड्डयांना कंटाळलेले लोक ५ तास रस्त्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गणेशनगर प्रभाग क्रमांक २६ मधील बजरंग चौक ते बळीराम पाटील हायस्कूलपर्यंतच्या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी सोमवारी सकाळी १० वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत गांधीगिरी आंदोलन केले.
परिसरातील त्रस्त नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन या रस्त्यावरून जाणाऱ्या- येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाला गुलाबाचे फूल देऊन खड्डे पडलेल्या रस्त्यांबद्दल निषेध व्यक्त केला.
बजरंग चौक ते बळीराम पाटील हायस्कूलपर्यंतच्या रस्त्यावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. िशवाय या भागात शाळा, दवाखाने, महाविद्यालय असल्यामुळे दुचाकी तसेच चारचाकींवरून जा - ये करणाऱ्या वाहनांची गर्दी असते. मात्र, या रस्त्याची चाळणी झाली असून िठकठिकाणी खड्डे पडले आहेत. नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करूनही या रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. िशवाय बळीराम पाटील ते बजरंग चौक -अाविष्कार कॉलनी - चिश्तिया चौक या मार्गात कुठेही सिग्नल यंत्रणा बसवण्यात आलेली नाही. योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकरही नसल्यामुळे इथे होणाऱ्या वाहतुकीवर कुठल्याच प्रकारचे नियंत्रण नसते. त्यामुळे या रस्त्यावरअनेकदा अपघात झाले आहेत. अनेकदा तक्रार करूनही कुणी दखल घेत नसल्याने या परिसरातील नागरिकांनी गांधीगिरी करत आंदोलन केले.

पोस्टरवर कॉमन मॅन
आंदोलक हातात फलक घेऊन उभे होते. ‘बळीराम पाटील शाळा ते बजरंग चौक या खड्डेमय रस्त्यातून आपण सुरक्षितपणे इथपर्यंत पोहोचल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन’ अशा आशयाचा मजकूर आणि आर. के. लक्ष्मण यांच्या प्रसिद्ध "कॉमन मॅन'चे चित्र होते. यात हेमंत जोशी, अविनाश दंडे, महेश निऱ्हाळी, संजोग खंडेलवाल, पुरूषोत्तम अग्रवाल, गौरव कुलकर्णी, सुनील पाटील आदींनी सहभाग नोंदवला.
जीव मुठीत घेऊन चालवावे लागते वाहन
बँकेत कामासाठी जात असताना खड्ड्यात पडून मला अपघात झाला. माझा हात फ्रॅक्चर झाला. संबंधितांनी वेळीच लक्ष घातले असते तर मला इतका त्रास झाला नसता. माझे आर्थिक नुकसान कोण भरून देणार? काशी साधू, शिक्षिका
रस्त्याचे काम सुरू होते त्यादरम्यान पावसाळा सुरू झाल्याने काम थांबवावे लागले. येत्या चार-पाच दिवसांमध्ये पुन्हा काम करण्यासंर्दभात आयुक्तांशी पत्रव्यवहार झालेला आहे.
प्राजक्ता भाले, नगरसेविका, गणेशनगर प्रभाग क्रमांक २६