आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे महापालिकेला जमले, मग औरंगाबादेत का शक्य नाही?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे निर्माण होणारी पर्यावरणाची समस्या दूर करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने यंदा कंबर कसली आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरीजने (एनसीएल) सुचवलेल्या पद्धतीने घरातच बेकरीचा सोडा वापरून बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी पालिका नागरिकांना दोन किलो सोड्याचे वितरण करत आहे. एनसीएलनेही विसर्जनासाठी दोन मोठ्या टाक्यांची सोय केली आहे. पुणे पालिकेप्रमाणेच आैरंगाबाद महापालिकेने असा प्रयोग केला तर पीओपीच्या मूर्तींमुळे होणारे जल आणि मातीचे प्रदूषण टाळता येणे शक्य आहे.
बेकरीमध्ये वापरला जाणारा सोडा म्हणजेच अमोनियम बायकार्बाेनेटच्या (NH4 HCO3) पाण्यात मिसळून यात पीओपीच्या गणपतीची मूर्ती विसर्जित केली तर ती विरघळत असल्याचा प्रयोग एनसीएलने केला आहे. एक फुटाच्या मूर्तीकरिता २५ रुपये खर्च येतो. मूर्ती विरघळल्यानंतर उरलेले पाणी खत म्हणून परसबागेत वापरता येते, तर बादलीत जमा झालेला चुना खडू तयार करण्यासाठी गृहोद्योगाला भेट म्हणून देता येतो. एनसीएलच्या कॅटलिस्ट डिव्हिजनच्या सीनियर सायंटिस्ट डॉ. शुभांगी उंबरकर यांच्या सकंल्पनेतून हा प्रयोग सत्यात उतरला आहे. गेली तीन वर्षे पीओपीच्या गणेशमूर्तींचे घरातच विसर्जन करण्याबाबत त्या प्रबोधन करत आहेत.

दोनकिलो सोडा मोफत
घरातच बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना वॉर्ड कार्यालयातून दोन किलो सोड्याचे मोफत वितरण सुरू केले आहे. हा सोडा १० लिटर पाण्यात मिसळून दाेन किलो वजनाच्या मूर्तीचे घरातच विसर्जन शक्य आहे. ही मूर्ती विरघळण्यास तास लागतात. मात्र, सोडामिश्रित पाण्याचा मूर्तीवर स्प्रे मारून मग तिचे विसर्जन केले तर ती ते तासांत विरघळत असल्याचे डॉ. शुभांगी उंबरकर यांनी सांगितले. ठिकठिकाणी गणेश मंडळांमध्ये याबाबत प्रबोधन केले जात आहे.
...तर प्रदूषण टळेल
^पुण्यात साडेसहा लाख गणेशमूर्तींचे विसर्जन होते. यात ९० टक्के घरगुती गणेश असतात. यापैकी ५० टक्के नागरिकांनी जरी आमच्या पद्धतीने घरातच मूर्तीचे विसर्जन केले तर जलसाठ्यांचे होणारे प्रदूषण टाळता येऊ शकेल. अन्य शहरांतही हा प्रयोग राबवणे शक्य आहे. -डॉ.शुभांगीउंबरकर, वरिष्ठ वैज्ञानिक, एनसीएल, पुणे

पालिकेचा पुढाकार हवा
^विसर्जनाचा कार्यक्रमहा महानगरपालिकेच्या अखत्यारीतील विषय आहे. विसर्जन विहिरींवर तसेच नजीकच्या नद्या, तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेकडून अमाेनियम बायकार्बाेनेटचे वितरण करायला हवे. -प्रा.डॉ. बलभीम चव्हाण, पर्यावरणशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेबआंंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

एनसीएलच्या विसर्जन टाक्या
एनसीएल नेत्यांच्या कॅम्पसमध्ये हजार लिटर क्षमतेच्या दोन टाक्या तयार केल्या आहेत. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरकडून १० टन अमोनियम बायकार्बाेनेट आणले आहे. ते पाण्यात मिसळून या ठिकाणी भाविकांच्या गणेशमूर्ती विसर्जनाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...