आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भूमिपुत्र'ने वाचवले ६५० प्राण, 'ना नफा ना तोटा' तत्त्वावर स्वर्गरथ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- पंढरपूरच्या नगर-औरंगाबाद महामार्गावर अपघात झाला. दुचाकीवर जाणाऱ्या कामगाराच्या डोक्याला जबर मार लागला. जखम दिसत नव्हती, पण वेळीच उपचार मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे साक्षीदार असलेले पोपटराव पाटील-आदिक यांना मनोमन ही गोष्ट खटकत होती. दोन दिवस कामात लक्ष लागले नाही. अपघातातील जखमींना वेळेवर उपचार मिळावेत या भावनेपोटी त्यांनी भूमिपुत्र बहुद्देशीय सामाजिक संघटनेच्या माध्यमातून १८ गावांसाठी स्वर्गरथ रुग्णवाहिका उपलब्ध केली. "भूमिपुत्र' रुग्णवाहिकेमुळे आजवर ४५० रुग्णांचे प्राण वाचले आहेत.
आतापर्यंत ६५० अंत्यसंस्कारांसाठी "ना नफा ना तोटा' या तत्त्वावर स्वर्गरथ उपलब्ध करण्यात आले आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ होऊन सुमारे चार वर्षांचा कालावधी उलटला. २० मे रोजी संस्थेचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. वाळूज परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. या भागातील १८ गावे मिळून सुमारे लाखांवर लोकसंख्या गेली आहे. त्यात वाळूज, बजाजनगर, रांजणगाव शेणपंुजी जोगेश्वरी या गावातील लोकसंख्या अधिक आहे. स्वर्गरथ रुग्णवाहिका नसल्याने नागरिकांची परवड व्हायची. बजाजनगर वसाहतीतील अयोध्यानगरात मुक्तिधाम आहे. सीएट कंपनीजवळून अंत्ययात्रा आणायची झाल्यास हे अंतर किलोमीटरचे आहे. स्वर्गरथमुळे बरीच गैरसोय दूर झाली. नगर-औरंगाबाद महामार्ग, औद्याेगिक वसाहतीतील कंपन्या, नवीन मुंबई महामार्ग आदी ठिकाणी अपघात घडतात. ही बाब लक्षात घेता स्वर्गरथ वातानुकूलित रुग्णवाहिका आणून त्याचा लोकार्पण सोहळा साजरा झाला. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचवता आले आहेत.
तातडीने औषधोपचार मिळाले
अपघातातीलजखमींना वेळेवर उपचार मिळाल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. जखमी व्यक्तींसोबत त्यांचे नातेवाईकही मोठ्या अडचणीत सापडलेले असतात. अशा वेळी रुग्णांवर अघटित प्रसंगही ओढवू शकतो. त्यांना तातडीने औषधोपचार मिळणे गरजेचे असते. रुग्णवाहिका उपलब्ध झाल्याने परिसरातील रुग्णांचा हा प्रश्न मिटला आहे. या कामी उद्योजक सूर्यभान राऊतराय, अर्जुन आदमाने, कैलास भोकरे, अंबादास मेटे, संतोष नरवडे, बालाजी शिंदे, नामदेव खराडे यांची मोठी मदत मिळाली.
- पोपटराव आदिक