आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीला अश्लील संदेश पाठवणारा गजाआड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तरुणीस अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग करणाऱ्या एकाविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला शनिवारी (दि.१२) पहाटे अटक केली आहे. माजिद खान साजिद खान (३१, रा. मोतीवालानगर) असे आरोपीचे नाव आहे. माजिद खान याने शहागंज येथे राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीच्या मोबाइलवर १४ नोव्हेंबर रोजी अश्लील संदेश पाठवले. या तरुणीने त्याच्याविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. मात्र, त्यानंतरही त्याने सलग १७ नोव्हेंबरपर्यंत मेसेज पाठवण्याचा धडाका लावला. अखेर डिसेंबर रोजी तरुणीने पुन्हा सिटी चौक पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्याला शनिवारी (दि.१२) पहाटे अडीचच्या सुमारास अटक करण्यात आली. माजिद याचे इंडियन लिबास नावाचे कपड्याचे दुकान आहे. तपास महिला पोलिस उपनिरीक्षक अजले करत आहेत.

वाहन चालकावर आरोप : अटकेनंतरमाजिद याने "अश्लील आय लव्ह यू'चे मेसेज आपल्या वाहनचालकाने पाठवल्याचे पोलिसांना सांगितले. याप्रकरणी फोन डिटेल्स तपासणे सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांनी सांगितले. माजिद यास शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याने मोबाइल चोरीला गेला असल्याचे सांगून हे मेसेज कुणी पाठवले, हे माहीत नसल्याचे न्यायालयाला सांगितले.
बातम्या आणखी आहेत...