आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना व भाजप युतीची शक्यता धूसर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पुढील महिन्यात होऊ घातलेल्या साताऱ्यातील दोन वाॅर्डांच्या निवडणुकीसाठी शिवसेना व भाजप यांच्यात युती होण्याची शक्यता आजच्या घडीला धूसर बनली आहे. येथील जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागा शिवसेनेच्या असल्याने दोन्ही जागा शिवसेनाच लढवणार असल्याचे शिवसेनेने आताच जाहीर केले असून भाजपने आमची युतीची तयारी असल्याचे सांगत फिफ्टी- फिफ्टी वाटप झाले पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे.

सातारा व देवळाई वॉर्डाची पोटनिवडणूक आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस होण्याचे संकेत आहेत. यंदा मनपा निवडणुकीत युती असूनही परस्परांविरोधात लढलेल्या शिवसेना व भाजपची या पोटनिवडणुकीत तरी युती होईल का, हा औत्सुक्याचा विषय आहे. शिवसेनेने या भागात मोर्चेबांधणी सुरू करत बैठकांचे सत्र सुरू केले आहे. दुसरीकडे भाजपमध्ये सध्या तरी अशा उघड हालचाली दिसत नसल्या तरी त्यांचीही यंत्रणा लवकरच कामाला लागणार आहे; पण या दोन पक्षांची युती होण्यावर मात्र प्रश्नचिन्हच लागले आहे.

शिवसेनेचे शहरप्रमुख राजू वैद्य म्हणाले की, जिल्हा परिषदेत सातारा व देवळाईच्या दोन्ही जागा शिवसेनेकडे होत्या. त्यामुळे नवीन दोन वाॅर्डांतही शिवसेनाच लढणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडामोडे म्हणाले की, युतीबाबत शिवसेनेशी अद्याप चर्चा झालेली नाही; पण युती व्हावी, अशी भाजपची भूमिका असून एक- एक जागा वाटून घ्यावी, अशी आमची भूमिका राहणारच आहे.

पुढे वाचा, सेनेचा भर सातारा वाॅर्डावर
बातम्या आणखी आहेत...