आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हवामानात बदल; राज्यात दाेन दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले असून समुद्रावरून उष्ण वारे, तर उत्तर पश्चिमेकडून थंड वारे वाहत आहेत. बाष्पयुक्त वारे आणि हवेच्या दाबामुळे औरंगाबादसह मराठवाडा, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, कोकणच्या काही भागात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामानातील बदलांमुळे थंडी कमी झाली असून दिवसांत किमान तापमानात अंशांनी वाढ झाली. 


जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांत अवघा १६ टक्केच साठा आहे. नोव्हेंबरमध्येच जिल्ह्यातील २४ गावांची तहान २५ टँकरने भागवली जात असून आगामी काळात जलसंकट तीव्र होण्याची चिन्हे आहेत. गंगापूर आणि फुलंब्री तालुक्यातील ७३ हजार नागरिकांची मदार टँकरवरच आहे. 


विक्रमी पावसामुळे (६२ मिमी) ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा कडाका जाणवला नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीची चाहूल लागली. १३ नोव्हेंबर रोजी प्रथमच किमान तापमान १३.० अंश सेल्सियसपर्यंत घसरले. राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे. गत सहा दिवसांपासून किमान तापमानात रोज वाढ होत असून १९ नोव्हेंबर रोजी ते १८ अंशांवर पोहोचले. २४ नोव्हेंबरपर्यंत वातावरण निवळेल. मात्र, तोपर्यंत महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असे हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले. 


मध्यम, लघु प्रकल्पात अल्प साठा
जिल्ह्यात १६ मध्यम प्रकल्प असून त्यात केवळ ३२ दलघमी (१६ टक्के) साठा आहे. गतवर्षी ५४ टक्के तर २०१५ मध्ये ३५ टक्के पाणीसाठा होता. जिल्ह्यातील ९० लघु प्रकल्पांची साठवण क्षमता १८४ दलघमी असताना या प्रकल्पांत ५३ दलघमी (२८ टक्के) आहे. 


गंगापुरात पाणी टंचाई
गंगापूरतालुक्यात १७ गावांना १७ टँकर्सने तर वैजापूर तालुक्यात एक आणि फुलंब्री तालुक्यात गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. फुलंब्री तालुक्यात १४ हजार ९०५ नागरिकांना टँकरने पाणी पुरवले जात आहे. या तालुक्यांसाठी प्रशासनाने १७ खासगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. 


पिकांवर परिणाम 
बदलत्यावातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप आदी आजारांनी डोके वर काढले. ढगाळ वातावरण पावसामुळे तूर, कपाशी, हरभरा, फळबाग, भाजीपाल्याचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...