आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poster Issue Aurangabad Municipal Corporation Issue

पोस्टर्सविरोधात महिला आक्रमक; तीव्र आंदोलन छेडण्याचा जागृती मंचचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महत्त्वाच्या ठिकाणी पोस्टर्स लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात येत आहे. पोस्टर्स लावणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे न्यायालयाचे आदेश असूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ऐतिहासिक स्थळांचे सौंदर्य लयास गेले आहे. तत्काळ पोस्टर्स हटवण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महिला जागृती मंचच्या वतीने देण्यात आला.

ऐतिहासिक स्थळे, विजेचे खांब, दिशादर्शक, शासकीय कार्यालयांच्या इमारती आदी ठिकाणी जाहिरातींचे पोस्टर्स चिकटवले जात आहेत. यामुळे शहराचे सौंदर्य लोप पावत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर्स हटवण्यात यावेत, अशी मागणी जागृती महिला मंचच्या वतीने करण्यात आली. मागणीवर विचार न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. यासंबंधीचे निवेदन उपमहापौर संजय जोशी, आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना देण्यात आले. जाहिराती लावण्यास परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आल्याचे प्रा. भारती भांडेकर यांनी सांगितले.