आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपर्यंत झाले ते झाले, आता पोस्टरबाजांवर गुन्हे दाखल करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आजपर्यंत शहरातील सार्वजनिक मालमत्तांवर पोस्टर्स लावली ती लावली, परंतु आता कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि सर्वसामान्य लोकांना वाहतुकीला अडथळा कराल तर थेट फौजदारी कारवाई करू, मग तो राजकीय पक्षाचा नेता असो की, एखाद्या खासगी कंपनीचा मालक, आम्ही कोणालाही जुमानणार नाही, असा इशारा मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिला आहे.
न्यायालयाला अहवाल पाठवायचा असल्याने शासनाशी पत्रव्यवहार केल्यानंतर मनपाने गेल्या आठवड्यात पोस्टरबाजांची घाण साफ केली. मात्र, यानंतर तीच ठिकाणे, काही चौक आणि रस्त्यांची ‘डीबी स्टार’ने पाहणी केली असता काही ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांनी आणि संस्था-संघटनांनी पुन्हा नव्याने पोस्टरबाजी केल्याचे दिसून आले. यावर २२ जानेवारी रोजी ‘शहर विद्रुपीकरण अजूनही सुरूच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल मनपा अायुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली आहे. पोस्टर्स लावून सार्वजनिक मालमत्तांचे विद्रुपीकरण आणि वाहतुकीला अडथळा निर्णाण करण्याची शहराची जुनी परंपरा आहे. आता ही परंपराच मोडून काढण्याचा निर्धार आयुक्तांनी केला आहे. शहरात नेमकी कुठे-कुठे पोस्टर्स चिकटवलेली आहेत, याची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे केंद्रेकरांनी सांगितले आहे. आता समज देणार नाही, तर थेट फौजदारी कारवाई करणार, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
सुनील केंद्रेकर, मनपाआयुक्त
पोस्टरबाजांवर कोणतीही कारवाई होत नाही...
शहरातबेकायदा फ्लेक्स लावले जातात, असे मला वाटत नाही. कारवाईचे आदेश दिले होते, ते काढले असावेत.
सार्वजनिकठिकाणी पोस्टर चिकटवून विद्रुपीकरण सुरूच आहे...
आतापर्यंतझाले ते झाले. ज्यांनी-ज्यांनी ही घाण केली, त्यांना ही शेवटची संधी आहे. यांनतर जो कुणी पोस्टर लावेल त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल.

आपल्याचअधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही...
ज्यांच्यावरही जबाबदारी होती, त्यांच्यावर इतर कामाचा भार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले असेल. आता मी स्वत: पाहणी करणार आहे. कोणालाही जुमानले जाणार नाही.