आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नैराश्याचा बळी: लग्न पुढे ढकलल्याने तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आर्थिक अडचण असल्यामुळे नियोजित नवरदेवाच्या कुटुंबीयांनी लग्नाची तारीख पुढे ढकलल्यामुळे सिडको एन संभाजी कॉलनीमधील सरिता विनोद सुरडकर १९ या तरुणीने सोमवारी संध्याकाळी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मात्र, आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, असे तिने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी सरिताचा साखरपुडा झाला होता. लग्नासाठी निवडलेला मुलगा तिला आवडला होता. २० सप्टेंबर लग्नाची तारीख ठरली होती. मुलाच्या कुटुंबाची आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांनी लग्न पुढे ढकलण्याची तिच्या आई-वडिलांना विनंती केली. नैराश्य आलेल्या सरिताने घरात कोणी नसल्याचे पाहून छताच्या हुकाला दोर बांधून गळफास घेतला. शेजाऱ्यांना घटनेची माहिती पोलिसांना दिली.