आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाना तिरसट नव्हे, तर स्वभावातच कोकणी खोट : नीलकांती पाटेकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जबरदस्त अभिनयातून चित्रपटसृष्टीत दबदबा निर्माण करणारे नाना पाटेकर त्यांच्या तिरसट स्वभावामुळे चर्चेत असतात; पण आमच्या वैयक्तिक आयुष्यात तो मला कधीच तिरसट वाटला नाही. त्या-त्या प्रांताची झलक माणसाच्या स्वभावात असते, तशी कोकणी खोटच त्यांच्या स्वभावात आहे. काही वेळा कामामुळे त्याची चिडचिड होते. पण लोकांना तो तसाच आवडतो. बहुतांश वेळा लोक त्याला तिरसट व्हायला भाग पाडतात, असे मत नाना पाटेकर यांच्या पत्नी नीलकांती पाटेकर यांनी मांडले.
एमजीएममध्ये पॉटरी स्टुडिओच्या उद््घाटन सोहळ्याला त्या आल्या होत्या. या वेळी अभिनय ते पॉटरी व्हाया नाना पाटेकर या प्रवासाबद्दल त्यांनी उपस्थितांशी दिलखुलास गप्पा मारल्या. त्या म्हणाल्या, २८ वर्षांपासून नाट्यचित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर बर्नी चित्रपटाद्वारे मी पुनरागमन केलं; पण दरम्यानच्या काळात युनियन बँकेतील नोकरी, दहावीच्या मुलांसाठी विज्ञान आणि गणितात कॉम्प्युटर ग्राफिक्समधील काम अशा निरनिराळ्या प्रकल्पांमध्ये मी व्यग्र होते. पण अभिनय हेच पहिलं प्रेम असल्यामुळे गोट मालिकेतून अभिनय करत आहे. देश आणि परदेशात विविध ठिकाणी पॉटरीच्या कार्यशाळा घेते अन् स्वत:चे कामही करते.
नानाची माझी भेट अलमासलमास नाटकाच्या निमित्ताने झाली होती. त्यात तो माझ्या वडिलांची भूमिका साकारत होता. पुढे प्रेम झालं आणि नंतर लग्न. अगदी चारचौघांसारखा आमचा संसार झाला. त्यात काहीच आणि कधीच फिल्मी झालं नाही.

‘आत्मविश्वास’नंतर वेगळ्या भूमिकाच आल्या नाहीत
माझंनाव घेतलं की आजही प्रत्येकाला आत्मविश्वास चित्रपट आठवतो. त्यामध्ये मी वयस्क महिलेची भूमिका केली; पण त्यानंतर मला सतत तशाच भूमिकांसाठी विचारणा होऊ लागली, पण मला ते करायचे नव्हते. माझ्या वयाच्या आणि आव्हानात्मक भूमिका आल्या नाही. कलेचे विविध प्रांत मला खुणावत गेले. नाना चिकित्सकपणे माझ्या कलाकृतींचे विश्लेषण करतो, पण मी माझ्या आणि तो त्याच्या प्रांतात आनंदी आहे.

अफेअरबद्दल नानालाच प्रश्न विचारा
१९९६ ला आलेल्या अग्निसाक्षी चित्रपटादरम्यान मनीषा कोईरालाशी नानांचे अफेअर असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर मात्र त्यांनी नानांकडे बोट दाखवले. हा त्याला विचारायला हवा असा प्रश्न आहे, त्याचे उत्तर मी कसे देऊ, असे त्या म्हणाल्या.
बातम्या आणखी आहेत...