आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन गटांत तुंबळ हाणामारी; १० जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - कारकीन येथे लहान मुलांच्या किरकाेळ भांडणातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. हाणामारीत मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा वापर करण्यात आला. दहा जण गंभीर जखमी असून यात दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

माजी सरपंच शेख सांडूभाई व तंटामुक्ती संघटनेचे अध्यक्ष शेख रज्जीक पटेल यांच्या गटात जोरदार हाणामारी झाली. यात मोठ्या प्रमाणावर चाकू, तलवारी, लोखंडी गज, लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आला. यात शेख सांडू शेख महंमद, मकसूद हुसेन पठाण, शेख रशीद, रियाज मकसूद पठाण, इस्लाम बालम शेख, वजीर शेख नजीर, अमन पठाण, हसन शेख मुज्जक नजीर शेख, रईस रशीद शेख हे गंभीर जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. शेख सांडू शेख महंमद यांच्या फिर्यादीवरून शेख रज्जीक शेख वजीर
यांच्यासह २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...