आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदय बंद पडल्यास पंपिंग करा, जीव वाचवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सराव करताना डॉ. वीणा मालाणी-राठी, डॉ. विमलेश पांडे, डॉ. अक्षय)
औरंगाबाद- कोणत्याही आजारात हृदय बंद पडले, तर ते पंपिंगद्वारे तत्काळ सुरू केल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात. हे पंपिंग नेमके कसे करायचे, याचे ग्रामीण तसेच शहरी भागात कार्यरत असलेल्या नवीन डॉक्टर आणि सिस्टर, ब्रदर, वॉर्डबॉय यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
त्याकरिता घाटीच्या औषधवैद्यक विभागात मॅनिकिन्स (सर्व अवयवांच्या रबरी प्रतिकृती) ठेवण्यात आल्या आहेत. मानव विकास मिशनचे आयुक्त भास्कर मुंढे यांनी मॅनिकिन्ससाठी १० लाख ३२ हजारांचे अनुदान दिले होते. यातून लाख ४० हजारांच्या मॅनिकिन्स आणण्यात आल्या.
जोखीम घेण्याची वेळ येणार नाही

- मॅनिकिन्सवर सराव करताना प्रक्रिया योग्य पद्धतीने होते किंवा नाही हे टिपणारे यंत्रही जोडले आहे. त्यामुळे अचूक सराव करता येतो. डॉक्टरच नव्हे, तर संपूर्ण स्टाफने हे प्रशिक्षण घ्यायला हवे.
काय आहेत मॅनिकिन्स?
मॅनिकिन्स म्हणजे मानवी शरीरातील अवयवांचा समावेश असलेला रबरी पुतळा असतो. शरीरात होणाऱ्या सर्व क्रिया यामध्ये होतात. कृत्रिम श्वासोच्छवास दिल्यास या मॅनिकिन्सची फुप्फुसे नैसर्गिक फुप्फुसांप्रमाणे फडफडू लागतात. रुग्णाला काही वेळा कृत्रिम श्वासोच्छवास द्यावा लागतो, काही वेळा अंबूमार्फत (कृत्रिम श्वासोच्छवासाचा पंप) श्वासोच्छवास देण्यासाठी उपकरणे जीभ आणि घशावाटे शरीरात टाकली जातात. शिकाऊ डॉक्टरांना याचा अनुभव नसतो. नळी अनावश्यक ठिकाणी जाऊन रुग्णाला जखमा होऊ शकतात आणि जलद उपचार झाल्याने प्राणही जाऊ शकतो. म्हणून मॅनिकिन्सवर कृत्रिम श्वासोच्छ्श्वास, इंजेक्शन, पंपिंग प्रक्रिया, व्हेंटिलेशन कसे करावे हे शिकता येते.
- मॅनिकिन्स विद्यार्थी डॉक्टर, नर्सिंग स्टाफसाठी उपयुक्त आहे. विशेषत: ग्रामीण भागातील डॉक्टर प्रशिक्षणासाठी येतात, त्यांना अचूक प्रशिक्षण देणे आता शक्य होणार आहे. यामुळे रुग्णाचा जीव वाचवणे शक्य होणार आहे.
डॉ. मंगला बोरकर, विभागप्रमुख, औषधवैद्यक विभाग
बातम्या आणखी आहेत...