आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी केली ५० कन्यादानाची सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मुलींच्या लग्नाचे ओझे वाटू नये म्हणून माजी आमदार, खासदार तथा औरंगाबाद शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी मराठवाड्यातील ५० मुलींचे कन्यादान करण्याचा संकल्प शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त केला होता. त्यातील पहिल्या कन्यादानाचे पुण्य येत्या २४ जानेवारीला त्यांच्या पदरी पडणार आहे. पैठण येथील रावसाहेब गोर्डे यांची कन्या मनीषा हिच्या विवाहासाठी लागणारे सर्व साहित्य जैस्वाल यांनी आज तिच्या पालकांकडे सुपूर्द केले.

एकर २० गुंठे जमीन, दोन मुली दोन मुले, पहिल्या मुलीचे लग्न झालेले, दुसऱ्या मुलीच्या लग्नाची तयारी केली,पण पैसे कमी पडत होते. तेवढ्यात ‘दिव्य मराठी’मध्ये बातमी झळकली आणि त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क केल्याने .
वस्तू सुपूर्द
शहरातीलशिवसेनेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात दुपारी मनीषाचे मंगळसूत्र, तिच्या नियोजित पतीसाठी अर्धा ग्रॅमची सोन्याची अंगठी, सोफासेट, पलंग, अशा वेगवेगळ्या ३० वस्तू तिच्या वडिलांकडे सोपवल्या जातात. हे फक्त शिवसेनाच करू शकते, असे गोर्डे यांनी सांगितले. या वेळी जैस्वाल यांच्यासह जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, शहरप्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले उपस्थित होते.