आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार प्रणिती शिंदे आज शहरात, अशोक चव्हाण यांच्या शहरात तीन सभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काँग्रेसच्या प्रचाराचा श्रीगणेशा १२ एप्रिलला (रविवार) होणार होता, परंतु उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर लगेचच जाहीर सभा घेण्यापेक्षा उमेदवारांना वॉर्डांत प्रचारासाठी वेळ दिल्यानंतरच जाहीर सभा घ्यावी, असा निर्णय झाला आहे. १४ एप्रिलला आमदार प्रणिती शिंदे प्रचारासाठी शहरात येणार असल्याचे प्रचारप्रमुख, आमदार सुभाष झांबड यांनी सांगितले.


१४ एप्रिलला प्रणिती शिंदे, त्यानंतर माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री नसीम खान ही मंडळी प्रचारार्थ शहरात सभा घेणार असून त्यानंतर प्रदेशाध्यक्ष या नात्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे शहरात दाखल होतील. या दौऱ्यात ते उमेदवारांशीही चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले. निवडणूक जिंकण्यासाठी शेवटच्या क्षणी रणनीती आखणे गरजेचे असते. त्यामुळे चव्हाण हे शेवटच्याच टप्प्यात उमेदवार तसेच स्थानिक नेत्यांना काही टिप्स देणार आहेत. त्यामुळेच त्यांनी १२ एप्रिलऐवजी पुढील तारीख येथील प्रचारासाठी दिली आहे. दुसरीकडे स्टार प्रचारक या नात्याने प्रणिती शिंदे यांना शहरात आणावे, अशी स्थानिक पदाधिकारी तसेच उमेदवारांची मागणी होती. ही मागणी मान्य झाली असून त्या १४ एप्रिलला शहरात प्रचारार्थ येणार आहेत. त्यांच्याबरोबर नसीम खान, माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील ही मंडळी शहरात सभा घेतील.


अशोक चव्हाण हे शुक्रवारी शहरात दाखल होत असून तीनठिकाणी त्यांच्या तीन सभा होणार आहेत.ठिकाण ठरवण्याचे काम स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सोपवले आहे.