आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रणिती शिंदे कोणी काय खावे यात सरकारी हस्तक्षेप नको

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कोणी काय खावे अन् काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सरकारने कोणाच्या ताटापर्यंत थेट जाऊ नये, ते स्वातंत्र्य तरी किमान अबाधित असावे, अशा शब्दांत राज्य शासनाच्या गोवंश हत्याबंदीवर आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मीडिया पॅनलच्या सदस्या प्रणिती शिंदे यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषदेत टीका केली.

मोदी सरकार सत्तेची वर्षपूर्ती साजरी करत असतानाच काँग्रेसनी ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन या सरकारचे अपयश जनतेसमोर मांडण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रणिती शहरात आल्या होत्या. त्या म्हणाल्या, गोवंश हत्याबंदी करून सरकार सामान्यांच्या ताटापर्यंत पोहोचत आहे. दुसरीकडे भाकड जनावरांचे काय करणार, याचे उत्तर सरकारकडे नाही. आतापर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होते आणि ते तसेच असायला हवे होते, असेही त्या म्हणाल्या.
मोदी सरकारवर टीका करताना त्या म्हणाल्या, मोदी यांनी जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळवली, विदेशात जाऊन भारत आतापर्यंत "गंदा' देश होता, असे सांगत अकलेचे तारे तोडले.
विदेशात असताना आपण कोण्या एका पक्षाचे नसतो, तर देशाचे प्रतिनिधित्व करत असतो याचा मोदी यांना विसर पडला. त्यामुळे जगात देशाची बदनामी झाली आहे. नमो, नमो करत सत्तेवर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आता जनतेला नको, नको झाले आहेत.
मोदी यांनी दौऱ्यावर असताना मंगोलियाला लाख डॉलर मदत मंजूर केली, परंतु संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी एक छदामही दिला नाही, अशी टीका त्यांनी केली. पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, डॉ. जितेंद्र देहाडे, डॉ. पवन डोंगरे उपस्थित होते.
शहरात जातीयवादावर सत्ता मिळवली
शिवसेना तसेच भाजपने औरंगाबाद महानगरपालिकेतही केवळ जातीयवादावरच सत्ता मिळवल्याचा आरोप त्यांनी केला. दोन समाजांत ध्रुवीकरण करून युती सत्ता मिळवत आहे, परंतु हे जास्त काळ टिकणार नाही, शेवटी ही जनता विकासावर मतदान करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बातम्या आणखी आहेत...