आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील भाजपचे यश आमदार बंब यांच्या पथ्यावर; मंत्रीपदाची शक्यता, खुलताबादमध्ये चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याचा लाभ यंदाच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकात भाजपला झाला आहे. त्यात निवडणूकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकांची जबाबदारी आमदार प्रशांत बंब यांच्यावर दिली. अन त्यांनी ती जबाबदारी लिलया पार पाडल्याचे निवडणूक निकालावरून दिसून येत आहे. 

जिल्हा परिषदेत पुर्वी भाजपचे चार सदस्य होते. आता जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून काम पाहणार आहे. त्यांचे एकूण २३ सदस्य निवडूण आले. यात आमदार बंब यांनी सर्वच ठिकाणी तरूण सुशिक्षित उमेदवारांना प्राधान्य दिल्याने भाजपला निवडणूकीत हे यश मिळाल्याचे बोलले जात आहे. निवडणूकांच्या निकालाचे फलीत म्हणून आता आमदार प्रशांत बंब यांचे मंत्रीमंडळात कॅबिनेटपद पक्के असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 

भाजपच्या यशाचे सर्व श्रेय आमदार बंब यांचे असून त्यांच्या खुलताबाद मतदारसंघात त्यांनी जिल्हा परिषदेचे एकूण तीन पैकी तिन्ही उमेदवार निवडूण आणले. तर पंचायत समितीतच्या सहा जागांपैकी चार जागा ताब्यात घेऊन बहुमत प्राप्त केले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे कॅबिनेटमंत्रीपद आता पक्के असल्याची चर्चा खुलताबादेत सुरू आहे. 

जिल्ह्यातील नऊ पंचायत समिती पैकी बहुतांश ठिकाणी भाजपने यश प्राप्त केले असून अनेक पंचायतीत भाजपची सत्ता आगामी काळात असणार आहे. आमदार बंब यांनी उमेदवारी देताना योग्य सुशिक्षित उमेदवार दिल्यानेच भाजपवर मतदारांनी पुन्हा विश्वास टाकला. गदाना गटातून त्यांनी गरूडझेप अॅकॅडमीचे प्रा. सुरेश सोनवणे, वेरूळ गटातून उच्च शिक्षित हिंदवी खंडागळे, तर बाजारसावंगी गटातून तलाठी संघटनेचे राज्याध्यक्ष एल.जी. गायकवाड आदींना उमेवारी दिल्याने मतदारांनीही या शिक्षित उमेदवारांना कौल दिल्याचे दिसून आले. एकूणच मुख्यमंत्र्यांनी टाकलेली जबाबदारी त्यांनी पुर्ण केल्याची चर्चा आहे. 

- खुलताबाद तालुक्यात एकूण तीन गटापैकी तिन्ही गटात भाजपचे उमेदवार विजयी 
- सहा गणापैकी एकूण चार गणात भाजपचे उमेदवार विजयी झाले. 
- कूणच मुस्लिम बहुल म्हणून ओळखला जाणाऱ्या खुलताबाद तालुक्यात यंदा प्रथमच भाजपला बहुमत मिळाले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...