आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pratik Ashok Mhaske Arrested In Aurangabad High Court

न्यायालयाच्या प्रलंबित निकालावर रोष; आत्मदहनासाठी कोर्टात आलेल्या युवकाला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रलंबित न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे हताश होऊन आत्मदहनासाठी आलेल्या युवकाला सोमवारी सकाळी 11 वाजता मुकुंदवाडी पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ परिसरातून अटक केली. प्रतीक अशोक म्हस्के (23) असे या तरुणाचे नाव असून तो सिंदखेडराजा येथील रहिवासी आहे. जालना पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने वडिलांचा बनावट राजीनामा घेऊन काढून टाकले असून बँकेच्या विरोधातील याचिकेचा निकाल रखडल्याचा आरोप त्याने केला आहे. दुपारी वैयक्तिक जातमुचलक्यावर (पी. आर. बाँड) त्याची सुटका करण्यात आली.

प्रतीकने आत्मदहनाचा इशारा मुकुंदवाडी पोलिसांना रविवारीच दिला होता. त्यानुसार पोलिस निरीक्षक जयकुमार चक्रे यांच्या नेतृत्वात गोपनीय शाखेचे उपनिरीक्षक एस. एम. कसबे, महेश आंधळे यांच्यासह पोलिसांचा ताफा अगोदरच खंडपीठात दाखल होता.

सकाळी अकराला प्रतीक आल्यानंतर पोलिसांनी त्याला त्वरित ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस ठाण्यात जबाब नोंदवून त्याच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली. सिडकोचे सहायक पोलिस आयुक्त विजय पवार यांच्यासमोर त्याला हजर करण्यात आले. पवार यांनी त्याला वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडले.

मात्र, खबरदारी म्हणून त्यांनी प्रतीकला बुलडाणा पोलिसांच्या स्वाधीन केले.

<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>बँकेचे अध्यक्ष, कर्मचार्‍यांवरही रोष

<ऊ्र58ं टं1ं3ँ्र>वडील अशोक म्हस्के (लिपिक) यांचा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने 1 ऑगस्ट 2004 रोजी बनावट राजीनामा तयार करून घेतला. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष रमेशचंद्र तवरावाला, प्रशासकीय अधिकारी बी. बी. नंदलाणी, रमेश रित्ती यांनीच षड्यंत्र रचून आपल्या वडिलांना कामावरून कमी केले, असा आरोप त्याने केला आहे. याविरोधात त्याने कामगार न्यायालयात दाद मागितली होती, पण काहीच उपयोग झाला नाही. म्हणून दीड वर्षापूर्वी अँड. आर. व्ही. गोरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकेत षड्यंत्र रचणार्‍या बँक अध्यक्षांसह कर्मचार्‍यांना प्रतिवादी करण्यात आले होते. मात्र, न्याय मिळत नसल्याच्या निराशेपोटी तो खंडपीठाच्या परिसरातच आत्मदहनाच्या इराद्याने आला होता.

एमबीबीएस प्रवेश हुकला

2009 मध्ये शैक्षणिक शुल्क न भरता आल्यामुळे एमबीबीएस प्रवेशापासून वंचित राहावे लागल्याचे प्रतीकचे म्हणणे आहे. नऊ वर्षांत घरातील प्रपंच चालवणे कठीण झाले होते. अँड. गोरे यांनीही नंतर वकीलपत्र रद्द केले होते. त्यामुळे दुसरे वकील नेमणे आणि पुन्हा वकिलाची फीस देण्याचे संकट त्याच्यासमोर असल्यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.

छायाचित्र :उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ परिसरात आत्मदहन करण्याचा इशारा देणार्‍या तरुणाला तो खंडपीठ परिसरात येताच पोलिसांनी ताब्यात घेतले.