आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO - पावसासाठी पांडूरंगाला साकडे; सोशल मिडियावर शेकडो पोस्‍ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्‍यभरात पेरण्‍या झाल्‍या. अर्धा जुलै महिना झाला तरी पावसाचा पत्‍ता नसल्‍याने शेतक-यांसह सर्वच घटक चिंतेत आहेत. लाखो रूपये खर्चून शेतक-यांनी पेरणी केली. पण वरूणराजा काही धरतीवर यायला तयार नाही. म्‍हणून दुबार पेरणीचे संकट उभे राहिल की, काय अशी चिंता जगाच्‍या पोशिंद्याला आहे. याच परिस्‍थितीत सध्‍या पावसाळा साकडे घालणा-या विविध पोस्‍ट व फोटो सोशल मिडीयावर येत आहेत.
काही तासात पावसाची शक्‍यता ?
दांडी मारलेला पाऊस लवकरच परतेल असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्‍याने वर्तवला आहे. अरबी समुद्रामध्‍ये कर्नाटकपासून केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्‍यता निर्माण झाली आहे. येत्‍या काही तासात कोकणात पावसाला सुरूवात होईल, तर विदर्भ मराठवाडा आणि मध्‍य महाराष्‍ट्रातही हलक्‍या स्‍वरूपाच्‍या पावसाला सुरूवात होईल असा हवामान खात्‍याचा अंदाज आहे.
'पंढरीच्‍या पांडूरंगा पिकासाठी पाणी दे'
आषाढी वारीसाठीही लाखो वारकरी, शेतकरी पंढरीत दाखल होत आहेत. तेव्‍हा वारक-यांच्‍या फोटोंसह सुंदर ओळींचे तयार केलेले ग्राफिक्‍स सध्‍या मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, पावसासाठी विविध विनवण्‍या..