आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prayas And Tejdhyan Foundation Initiative For Kranti Chowk Flyover

संवेदनाहीन महापािलकेला चपराक, प्रयास आणि तेजज्ञान फाउंडेशनने पुढाकार घेऊन काढली उड्डाणपुलावरची माती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - क्रांतीचौक उड्डाणपुलावरील कठड्याशी साठलेली माती उचलण्यासाठी शहरातील प्रयास आणि तेजज्ञान फाउंंडेशनच्या तरुणांनी शनिवारी पुढाकार घेतला आणि क्रांती चौक उड्डाणपुलावरची माती उचलून तिथला एक धोका कमी केला. महापािलका प्रशासन मात्र आपली संवेदनहीनता दाखवत निद्रिस्तच राहिले.
क्रांती चौक उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून खाली पडून गुरुवारी रात्री दोन सीआयएसएफचे जवान ठार झाले. उड्डाणपुलावर कठड्याच्या पायथ्याशी साचलेले मातीचे ढिगारे, बंद असलेले पथदिवे, गतिरोधकाच्या अलीकडे तसेच कठड्याला रिफ्लेक्टर नसल्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता 'दिव्य मराठी'ने केेलेल्या पाहणीत समोर आली. आणखी एखादा अपघात होऊन कुणाचा जीव जाण्याआधी राज्य रस्ते विकास महामंडळ आणि महापािलकेने पावले उचलावीत. मातीचे ढिगारे उचलण्याचे काम तत्काळ केले जावे, अशी अपेक्षा दिव्य मराठीने व्यक्त केली होती. मनपाने त्याची दखल घेतली नसली तरी प्रयास आणि तेजज्ञानच्या कार्यकर्त्यांनी संवेदनशीलता दाखवित पुलावरची माती उचलून नेली.

महापािलकेने निदान दिवे तरी लावावेत
क्रांती चौकातील उड्डाणपुलावरची माती हटवून तरुणांच्या आणि जागृत नागरिकांच्या दोन संस्थांनी महापािलकेला अप्रत्यक्षपणे चपराकच लगावली आहे. आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत ‘िदव्य मराठी'च्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल या दोन्ही संस्थांना आणि रस्त्यावर उतरून माती साफ करणाऱ्या सर्वांनाच औरंगाबादकरांतर्फे लाख लाख धन्यवाद! जे करणे शक्य होते ते या नागरिकांनी केले आहे. आता निदान त्या पुलावरचा अंधार दूर करण्याचे काम तरी महापािलकेने तत्परतेने करायला हवे. नागरिकांना शक्य असते तर त्यांनी तेही केले असते; पण ती बाब पूर्णपणे महापािलकेच्या अखत्यारीतली आहे आणि त्यामुळे महापािलकाच ते करू शकते याची जाणीव तरी प्रशासनाने ठेवायला हवी. महापौर, उपमहापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी आता तरी थोडी संवेदना दाखवावी,अशी अपेक्षा आहे. वळणावर पुलाच्या कठड्यांना आणि गतिरोधकांवर ठळकपणे दिसतील असे रिफ्लेक्टर बसवण्याचीही गरज आहे. त्यासाठी औरंगाबादच्या उद्याेजकांपैकी कोणी तरी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आम्ही या निमित्ताने करीत आहोत. महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाला जाग येईल तोपर्यंत आणखी एखादा जीव गमावणे आपल्याला परवडणारे नाही, हे आपल्यालाच लक्षात घ्यावे लागणार आहे.

आठ गोण्या
कठड्याच्या पायथ्याशी जमलेली माती म्हणजे अपघाताला निमंत्रण आहे, ही बाब दिव्य मराठीने निदर्शनास आणून दिली. त्याची जबाबदार औरंगाबादकर म्हणून आम्ही दखल घेत मोहीम हाती घेतली, असे दोन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकाने थोडा वेळ सामाजिक उपक्रमांसाठी दिला तर अनेक समस्या सुटतील. त्याचबरोबर महानगरपालिकेला जागे करण्याचीही गरज आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

यांनी दाखवली संवेदना
वैभव कुलकर्णी, दानेश बाशा, राहुल चौधरी, अभिषेक पगारे, रवि चौधरी, किसन यादव, इंद्रप्रकाश चौधरी (प्रयास ग्रुप), राजेंद्र भालेराव, कैलास बोरसे, प्रकाश देशपांडे, अंकुश गायकवाड, दर्शना बेलसरे, विलास कवळे, सूर्यकांत गोरे, ठाकुरसिंग पवार (तेजज्ञान फाउंंडेशन) आणि अॅपे रिक्षाचालक अनिल चोरमले.