आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prayas Group News In Marathi, Prayas Group Tree Planting On Gogobaba Hill

औरंगाबादला हरित करण्याचा ‘प्रयास’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐ तिहासिक वारसा असलेल्या औरंगाबादची ओळख हरित शहर म्हणून करण्यासाठी शहरातील प्रयास ग्रुपचे तरुण प्रयत्न करीत आहेत. पर्यावरणाची आवड असणार्‍या या तरुणांनी एकत्र येत विद्यापीठ परिसरातील गोगाबाबा टेकडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम सुरू केला आहे. एवढेच नव्हे, तर दर रविवारी ही मंडळी झाडांना पाणी देतात. डोंगरावरील पाणी अडवण्यासाठी छोटे छोटे बंधारे तयार करतात.

या ग्रुपमध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, बी.कॉम, कला अशा विविध क्षेत्रांतील विद्यार्थी आहेत. या कामाने आपला रविवार सार्थक होतो, असे या तरुणांचे मत आहे. विद्यापीठात शिकणार्‍या रवी चौधरी या तरुणाने या सगळ्या तरुणांना एकत्र करून हा उपक्रम सुरू केला आहे. सध्या 50 पेक्षा अधिक तरुण या उपक्रमात सहभागी आहेत. या वर्षी प्रयासने गोगाबाबा टेकडीवर रोपे लावण्याचा संकल्प केला आहे. याशिवाय प्रयास ग्रुपच्या सदस्यांनी निर्माल्य एकत्र करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे, अपंग विद्यार्थ्यांना मदत करणे, शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नलवर फलक घेऊन उभे राहणे असे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यासाठी प्रकाश कुलकर्णी, मनोज वृषाली, प्रीतेश गवस, स्वप्ना कुलकर्णी, अनुजा चिंचोलकर, दीपाली सोनवणे, अंजली बोराडे, जितेंद्र चौधरी, कुलभूषण बोंबले, दिनेशकुमार जैन हे पर्शिम घेत आहेत.