आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pregnanat Woman Dead In Ghati Hospital Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उपचारांकडे दुर्लक्ष झाल्याने गर्भवतीचा घाटीत मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आयसीयू-एमआयसीयू नसल्याने धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाने पाठवलेल्या 22 वर्षीय गर्भवतीची प्रकृती अत्यंत गंभीर असूनही शेवटपर्यंत तिला घाटीच्या एमआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले नाही. वारंवार विनंत्या करूनही उपचारांकडे साफ दुर्लक्ष केले आणि त्यामुळेच पत्नीचा मृत्यू झाला, अशी तक्रार पतीसह नातेवाइकांनी ‘दिव्य मराठी’कडे केली आहे.

मायाबाई आनंदा कोडी (रा. अक्कडसे, ता. सिंदखेड, जि. धुळे) या महिलेच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे संबंधित खासगी डॉक्टरांनी सांगितल्यावर धुळ्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आयसीयू-एमआयसीयूची सुविधा नसल्याचे कारण देत महिलेस घाटीत पाठवण्यात आले. तसे रेफरन्स लेटरही देण्यात आले. त्यानुसार 28 मार्चला मध्यरात्री दोन वाजता रुग्णाला वॉर्ड क्रमांक 27 मध्ये दाखल करण्यात आले.

मात्र, वारंवार विनंती करूनही एमआयसीयूत दाखल केले नाहीच, शिवाय उपचारांकडेही दुर्लक्ष केले. डॉक्टर-कर्मचार्‍यांनी चांगली वागणूक दिली नाही. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच पत्नीचा मृत्यू झाला, अशी तक्रार मायाबाई यांचे पती आनंदा नानाभाऊ कोडी, त्यांचे नातेवाईक मनोहर सनेर यांनी केली.