आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डय़ांमुळे गर्भवतीची धावत्या रिक्षातच प्रसूती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-खड्डय़ांमुळे सबंध शहरातील नागरिक त्रस्त असतानाच हादरे बसून एका महिलेची रिक्षातच प्रसूती झाल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. त्या महिलेला हडकोतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाळ आणि बाळंतिणीची प्रकृती ठीक असल्याचे या वेळी डॉक्टरांनी सांगितले.
खड्डय़ांमुळे शहरात सध्या अनेक अपघात होत आहेत. काहींना मणक्याचे आजारही जडले आहेत. परंतु रिक्षातून रुग्णालयात जाणार्‍या गर्भवतीला खड्डय़ांत हादरे बसून प्रसूती होण्याच्या प्रकाराने संताप व्यक्त केला जात आहे. रविवारी हसरूल येथील गर्भवतीला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे नातेवाइकांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रिक्षा बोलावला. हसरूलमधून जळगाव रोडमार्गे जाताना रिक्षाचालकाने रस्त्यातील अनेक खड्डे वाचवले. पण रुग्णालयापासून जवळच असलेल्या हडकोतील एका मोठय़ा खड्डय़ात रिक्षा आदळल्यानंतर ती महिला प्रसूत झाली. त्यानंतर नातेवाइकांनी संबंधित महिलेला कुलकर्णी मॅटर्निटी होममध्ये दाखल केले.
दोघांची प्रकृती उत्तम
गर्भवती महिला प्रसूतीसाठी माझ्याकडे येणार होती. मात्र रिक्षातच तिची प्रसूती झाली. त्यानंतर ते माझ्याकडे आले. बाळ आणि बाळंतिणीची तब्येत चांगली आहे. - डॉ. अलका कुलकर्णी, हडको.