आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सॉर बोर्डाचे सदस्य प्रेमरत्न शर्मा यांचे महिला सदस्यांवर ताशेरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चित्रपटातील अश्लील दृश्ये काढून टाकण्यासाठी प्रयत्न असतो; परंतु बोर्डातील महिला सदस्यांना अशा दृश्यांवर काही आक्षेप नसतो. उलट ती दृश्ये काढण्यास त्यांच्याकडूनच विरोध होतो, असे मुंबई सेन्सॉर बोर्डाचे सदस्य प्रेमरत्न शर्मा यांनी सांगितले. सेन्सॉर बोर्डाच्या कामात पारदर्शकता आणण्याची गरज निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

जागृती मंच, सर्मथनगर महिला मंडळ, स्त्री जागरण मंच यांच्या वतीने मंगळवारी वरद गणेश मंदिराच्या सभागृहात संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य सतीश कल्याणकर, ताराबाई बसोले यांची उपस्थिती होती. शर्मा म्हणाले की,
चित्रपटातील अश्लील दृश्य काढून टाकण्यासाठी तीन टप्प्यांत काम होते. पहिले आम्हाला नको असलेले दृश्य काढण्यासाठी सांगत असताना महिला सदस्य ते काढू देत नाहीत, येथे काही मर्यादा येत आहेत. याबरोबरच सेन्सॉर बोर्डात अजूनही पारदर्शकता आलेली नाही. या वेळी मीरा पाटील, ज्योती चिटगोपेकर, सत्यप्रभा अष्टपुत्रे, लीला वरूडकर, शिवाली देव, किरण शर्मा, अरुणा मालोदे, सोनिया खडके उपस्थित होत्या.

वरद गणेश मंदिराच्या कार्यक्रमात प्रेमरत्न शर्मा, सतीश कल्याणकर, तारा बसोले आदींची उपस्थिती होती.

आरोप
सेन्सॉर बोर्ड ही स्वायत्त संस्था असल्यामुळे त्या ठिकाणी मनमानीपणे कारभार चालतो. बोर्डातील सदस्यांना नियम, कायदे यांची परिपूर्ण माहिती व्हावी यासाठी अद्यापही कार्यशाळा घेण्यात आलेली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने कामात पारदर्शकता आणण्याची गरज असल्याचे शर्मा म्हणाले. याबरोबरच चित्रपटातील दृश्य काढून टाकताना होत असलेला विरोध यापाठीमागे काही राजकारण असल्याचे सतीश कल्याणकर यांनी सांगितले.