आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यमान जमीन वापर नकाशा जाहीर, आयुक्तांच्या आदेशानंतर नगररचना विभागाने केली हालचाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सद्य:स्थितीतीलजमीन वापराचा आतापर्यंत लपवला जात असलेला नकाशा (ईएलयू) अखेर मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशानंतर तत्काळ मनपाच्या वेबसाइटवर जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे आधीच्या विकास आराखड्यात केलेले घोळ त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती उघड होणार आहे.
२८ डिसेंबर रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेसमोर शहराचा प्रस्तावित विकास आराखडा मांडण्यात आला. नियमानुसार विकास आराखडा तयार करताना विद्यमान जमीन नकाशा अर्थात ईएलयू नकाशाचा वापर करायला हवा होता. किमान वर्षभर आधी ईएलयूचे नकाशे जाहीर करून त्यावर सर्वांची मते आक्षेप जाणून घेऊन त्यानुसार विकास आराखडा तयार करणे अपेक्षित होते. पण येथे आॅगस्ट २०१४ ला नगररचना उपसंचालक कार्यालयाने मनपाकडे हे नकाशे दिले होते, असे उपसंचालक एसजी पाटील यांनीच जाहीरपणे सांगितले होते. मागच्या वर्षात समीर राजूरकर वगळता कोणत्याही नगरसेवकाने ईएलयूच्या नकाशांचा आग्रह धरला नाही. मनपाने कसेही करून हे नकाशे समोर येऊ देण्याचे ठरवलेच होते. परिणामी प्रस्तावित विकास आराखडा तयारही झाला, पण ईएलयूचे नकाशे काही समोर आलेच नाहीत. आता प्रस्तावित विकास आराखड्यात आरक्षण टाकताना नागरिकांची घरे तुटणार, अशी ओरड सुरू झाली आहे. पण प्रत्यक्षात ईएलयूचे नकाशे जाहीर झाले असते तर ही वेळच आली नसती. ईएलयू नकाशांबाबत ओरड सुरू झाल्यानंतर मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी परवा नगररचना विभागाला आदेश देत ईएलयूचे नकाशे आॅनलाइन जाहीर करायला सांगितले. परिणामी काल रात्रीच पाचही विभागांचे विद्यमान जमीन वापर नकाशे पालिकेच्या वेबसाइटवर अपलोड केले आहेत.